सायबर चोरट्यांचा नवा फंडा, रिकामे खोके फेकू नका , पार्सल बॉक्स स्कँडल

 

प्रेस मीडिया लाईव्ह :

विशेष प्रतिनिधी : सुनील पाटील

 सध्या अनेक जण खाण्या-पिण्यापासून ते जीवनोपयोगी अशा बहुतांश गोष्टी ई-कॉमर्स वेबसाइटवरून मागवतात. यामुळे पाहिजे तेव्हा पाहिजे ती वस्तू घरबसल्या मिळते. पण यादरम्यान तुमच्याकडून कळत-नकळत झालेली एक चूक तुमचे बँक खाते रिकामे करू शकते.

सध्या फसवणुकीचा नवा प्रकार सुरू आहे. ई-कॉमर्स साइट्सवरून मागवलेल्या वस्तूंचे चांगल्या पद्धतीने पॅकेजिंग केलेले असते. ज्या पार्सल बॉक्समध्ये वस्तू पॅक केल्या जातात तो बहुतेकदा कचऱ्यात फेकला जातो. जर तुम्हीही असे काही करत असाल तर तुम्ही सावधगिरी बाळगा. कारण कचऱ्यात टाकलेले पार्सलचे बॉक्स घोटाळेबाजांसाठी खूप उपयुक्त ठरतात. याचा गैरफायदा घेऊन घोटाळेबाज तुमची लाखो रुपयांची फसवणूक करू शकतात.

१) घोटाळेबाज प्रथम तुमच्या पार्सल बॉक्सच्या मदतीने तुमची गोपनीय माहिती चोरतात.

२) यानंतर ते तुम्हाला कोणत्या ना कोणत्या बहाण्याने भेटतात आणि कोणत्याही प्रकारे तुमच्या ओळखीच्या व्यक्तीला कॉल करण्यास सांगतात.

३) पेमेंट गेटवेवर तुमची गोपनीय माहिती भरल्यानंतर दुसऱ्या बाजूला स्कॅमर तयार असतो.

४) त्याचा ओटीपी तुमच्या मोबाईलवर येताच, तो ओटीपी तुमच्या नकळत त्याच्यासोबत शेअर करतो आणि क्षणार्धात तुमचे खाते पूर्णपणे रिकामे होते.

पार्सल बॉक्सवर असते माहिती

तुम्हाला जेव्हा पार्सल दिले जाते तेव्हा त्याच्याव रमहत्त्वाची माहिती नोंदवलेली असते. संबंधित बॉक्सवर तुमचे पूर्ण नाव, घराचा पत्ता, मोबाईल नंबर आणि ऑर्डर नंबर देखील नोंदवलेला असतो. पार्सल घरी आल्यावर आपल्याला ते उघडून वस्तू पाहण्याची घाई असते, तेव्हा या बॉक्सकडे तुमचे दुर्लक्ष होते. हा बॉक्स कचऱ्यात कुठे गेला हेही तुम्हाला कळत नाही. पण हा बॉक्स टाकून देण्यापूर्वी तुम्हाला माहितीचा स्टिकर काढून फाडायला हवा. तुम्ही पार्सल बॉक्स कचऱ्यात

असाच फेकत असाल तर तुम्ही स्वतःसाठी संकटाला आमंत्रण देत आहात.

■ तुम्ही तुमचा पार्सल बॉक्स नष्ट न करता कचऱ्यात फेकून दिला असेल आणि तो एखाद्या घोटाळेबाजाच्या हाती लागला तर तुमचे बैंक अकाऊंट रिकामे होऊ शकते. पॅकेजवर लिहिलेल्या ऑर्डर नंबरद्वारे तुमचे नाव, पत्ता, तुमचा मोबाईल नंबर आणि बँकिंग तपशिलांसह अनेक महत्त्वाची माहिती घोटाळेबाजांना मिळते. तुमचे खाते रिकामे करायला स्कॅमर्सना ही माहिती पुरेशी असते.

Post a Comment

Previous Post Next Post