कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे प्रमोदिनी माने मॅडम यांच्या हस्ते महिलांचा सत्कार करण्यात आला.
प्रेस मीडिया लाईव्ह :
सौ. प्रमोदिनी माने :
वारणा कोडोली : 8 मार्च जागतिक महिला दिनानिमित्त श्री वारणामाई हायस्कूल काखे तालुका पन्हाळा जिल्हा कोल्हापूर शाळेमार्फत श्री वारणामाई फाउंडेशन अंतर्गत महिला दीन कार्यक्रम पार पडला .
या कार्यक्रमाला शाळेचे सचिव व फाउंडेशन चे अध्यक्ष श्री राहूल निवास खामकर यांनी फाउंडेशन कडून एकल पालक गरीब दत्तक विद्यार्थी,महिला सबलीकरण, साक्षर व्यावसायिक प्रशिक्षण अश्या अनेक उद्देश ठेवून काम करत आहे. आजच्या कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे प्रमोदिनी माने मॅडम यांच्या हस्ते महिलांचा सत्कार करण्यात आला.
कार्यक्रमाचे अध्यक्ष लोकनियुक्त महिला सरपंच राजश्री पाटील, एमपीएससी मधून निवड झालेल्या विद्यार्थ्याच्या मातांचा सत्कार व समाजकार्य करणऱ्या महिलांचा सत्कार करण्यात आला त्यामध्ये महसूल सहाय्यक पदी धनाजी अनुसे यांच्या आई अंजना अनुसे व मोहरे गावच्या अनिकेत शिंदे व पल्लवी शिंदे ह्या दोघांची ही निवड झालेल्या त्यांच्या आईचा पुष्पा शिंदे तसेच समाज सेवेत हातभार लावणाऱ्या महिलांचा ही सत्कार करण्यात आला त्यामध्ये शुभांगी कांबळे,सुवर्णा बाडगुडे संपदा पाटील ,माधुरी कांबळे,अर्चना शेंडगे, मंगल दाभाडे ह्या महिलांचा सत्कार करण्यात आला. आजच्या या कार्यक्रमाला मुलींनी स्त्रीचं महत्त पटवून देणारे नृत्य सादर केले.आज कोणत्या पदापर्यंत स्त्री पोहचू शकते हे वेशभूषेतून दाखवण्यात आले.या फाउंडेशनच्या सचिव, गौरी पोवार यांनी प्रास्ताविक केले. सूत्रसंचालक उपाध्यक्षा प्रविणा कापरे ,सदस्या सुनीता सुतार यांनी केले. आभार सदस्या शिल्पा शिंदे यांनी केले.
या कार्यक्रमला शाळेचे संस्थापक निवास खामकर व पदाधिकारी उपस्थित होते.कार्यक्रमाला शाळेचे शिक्षक व फाऊंडेशनचे खजिनदार जयवंत पाटील सर ,आनंदा काळे सर बाबसो घोलप सर सावकर चव्हाण सर यांचे सहकार्य लाभले.