प्रेस मीडिया लाईव्ह :
सुनील पाटील : विशेष प्रतिनिधी
पनवेलमध्ये बेकायदा धंदे आणि भ्रष्टाचाराविरोधात सातत्याने आवाज उठवणारे पत्रकार डॉ. मुनीर तांबोळी यांनी आपल्या जीवाला धोका असल्याची तक्रार केली आहे. स्थानिक माफिया आणि अवैध धंदे करणाऱ्यांकडून जीवे मारण्याचा कट रचला जात असल्याचा आरोप त्यांनी केला आहे. यासंदर्भात त्यांनी नवी मुंबई पोलिस आयुक्तांना पत्र लिहून संरक्षणाची मागणी केली आहे.
डॉ. तांबोळी हे केंद्रीय लोकशाही पत्रकार संघाचे महाराष्ट्र प्रदेश अध्यक्ष असून त्यांनी आपल्या पत्रकारितेतून अनेक गैरव्यवहार उघडकीस आणले आहेत. महापालिकेतील भ्रष्ट कारभार, अवैध बांधकामे, जुगार अड्डे आणि अनधिकृत हॉटेलमालकांविरोधात त्यांनी सातत्याने आवाज उठवला आहे.
यामुळे माफियांचे धाबे दणाणले आहेत. नुकतेच डॉ. तांबोळी यांनी पनवेल महापालिका क्षेत्रातील बेकायदा बांधकामांबाबत वृत्त प्रसिद्ध केले होते
यामुळे महापालिकेने कारवाई करत हे बांधकाम जमीनदोस्त केल्याने संतप्त झालेल्या माफियांनी त्यांना धमकावण्याचा प्रयत्न केला. त्यात यश न मिळाल्याने त्यांनी डॉ. तांबोळी यांच्यावर खोटा गुन्हा दाखल करण्याचाही प्रयत्न केला, पण तो अयशस्वी ठरला. त्यामुळे हताश झालेल्या या माफियांनी आता त्यांना जीवे मारण्याचा कट रचल्याचा आरोप डॉ. तांबोळी यांनी केला आहे. पोलिस आयुक्तांना लिहिलेल्या पत्रात डॉ. तांबोळी यांनी आपल्या जीवाला धोका निर्माण करणाऱ्या व्यक्तींची नावे नमूद केली आहेत.
महाराष्ट्रात पत्रकारांवरील हल्ल्यांच्या पार्श्वभूमीवर डॉ. तांबोळी यांची तक्रार गंभीर मानली जात आहे. याबाबत केंद्रीय लोकशाही पत्रकार संघाचे राष्ट्रीय अध्यक्ष
पत्रकारितेवरील हल्ल्यांचा धोका वाढतोय ?
महाराष्ट्रात पत्रकारांवर होणारे हल्ले ही चिंतेची बाब बनली आहे. बेकायदा धंद्यांविरोधात आवाज उठवणाऱ्या पत्रकारांना धमक्या देणे, मारहाण करणे आणि प्रसंगी हत्या करण्याच्या घटना घडल्या आहेत. पत्रकारांच्या संरक्षणासाठी कायदा असूनही अशा घटना थांबत नसल्याने, कायद्याच्या अंमलबजावणीवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. डॉ. तांबोळी यांच्या तक्रारीमुळे हा मुद्दा पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे.
राजू दळवी गृहमंत्र्यांना पत्र देणार असून तांबोळी यांना संरक्षण देण्याची मागणी करणार असल्याचे त्यांनी सांगितले. प्रत्येक जिल्ह्यातून संघाच्या वतीने याबाबत निषेध व्यक्त करत पत्रव्यवहार करण्यात येणार आहे.