प्रेस मीडिया लाईव्ह :
काही दिवसांपूर्वीच राज्य सरकारने राज्यातील वाहनांबाबत एक महत्वाचा निर्णय घेतला.राज्यात जी वाहनं जी वाहनं 1 एप्रिल 2019 पूर्वी रजिस्टर झाली आहेत, त्यांच्यासाठी High Security Registration Plate (HSRP) नंबरप्लेट अनिवार्य असणार आहे. ही नंबर प्लेट लावण्यासाठी राज्य सरकारने 30 एप्रिल 2025 पर्यंतची मुदतवाढ दिली आहे. जर या वेळेत तुम्ही ही नंबर प्लेट बसवली नाही तर मग तुम्हाला दंड बसू शकतो. या र्निणयामुळे आता वाहनचालक HSRP नंबर प्लेट लावण्याच्या कामात गुंतले आहे. पण काही असे देखील वाहनं आहेत ज्यांना हा नियम लागू होत नाही.ज्या वाहनांचे रजिस्ट्रेशन 1 एप्रिल 2019 नंतरचे असेल, त्यांनी नवीन नंबरप्लेट बसवायची गरज नाही. पण हे HSRP नंबर प्लेट म्हणजे काय? चला जाणून घेऊया.
HSRP नंबर प्लेट ही अॅल्युमिनियमपासून बनवण्यात येणारी नंबर प्लेट आहे. ही नंबर प्लेट वाहनाच्या पुढच्या आणि मागच्या बाजूस बसवण्यात येते. HSRP च्या डाव्या कोपऱ्यात ब्लू क्रोमियम-आधारित अशोक चक्र होलोग्राम असतो. तसेच, त्याच्या डाव्या कोपऱ्यातच एक वेगळा लेसर-ब्रँडेड 10-अंकी स्थायी ओळख क्रमांक (PIN) कोरलेला असतो.
याशिवाय, रजिस्ट्रेशन क्रमांकातील अक्षरे आणि अंकांवर हॉट-स्टॅम्प फिल्म लावली जाते, तसेच त्यावर निळ्या रंगात 'IND' मुद्रित केले जाते. विशेष म्हणजे, वाहनाच्या डिजिटल रजिस्ट्रेशननंतरच HSRP जारी केली जाते, त्यामुळे या प्लेट्स इतर कोणत्याही कारसाठी वापरता येत नाहीत. तसेच तुमच्या वाहनाच्या सुरक्षितेत भर होते.
ज्या वाहन मालकांनी आपली वाहनं 1 एप्रिल 2019 पूर्वी खरेदी केली आहे, त्यांनी वाहनांना HSRP नंबर प्लेट लावणे अनिवार्य आहे. हा निर्णय राज्य सरकारकडून घेण्यात आला आहे. या निर्णयामागचे कारण म्हणजे 2019 पूर्वीच्या नंबरप्लेटमध्ये अनेक गैरवापर होण्याची घटना होत होती. या नंबर प्लेट सहज काढता आणि बदलता येत होत्या, ज्यामुळे वाहन चोरीच्या घटना सातत्याने वाढत होत्या. यामुळेच सरकारने HSRP नंबर प्लेट लावणे अनिवार्य केले आहे. HSRP नंबर प्लेट या एकदाच वापरल्या जाऊ शकतात. जेणेकरून, वाहनांची सुरक्षितता नीट राहील आणि ते चोरी व्हायचे प्रमाण सुद्धा कमी होतील.