प्रतिज्ञापत्रासाठी 500 रुपयांचे मुद्रांक शुल्क माफ, राज्यातील लाखो विद्यार्थी, नागरिकांना मोठा दिलासा __महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांचा मोठा निर्णय



प्रेस मीडिया लाईव्ह :

प्रतिज्ञापत्रासाठी 500 रुपयांचे मुद्रांक शुल्क माफ, राज्यातील लाखो विद्यार्थी, नागरिकांना मोठा दिलासा __महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांचा मोठा निर्णय ही महायुती सरकारकडून आनंद वार्ता आहे....

• जात पडताळणी प्रमाणपत्र 

 • उत्पन्नाचा दाखला

• रहिवासी प्रमाणपत्र

• नॉन क्रिमिलेयर सर्टिफिकेट 

• राष्ट्रीयतत्व प्रमाणपत्रासह

• शासकीय कार्यालयात दाखल  करायच्या *सर्व प्रकारच्या प्रतिज्ञापत्रासाठी जोडावे लागणारे 500 रुपयांचे मुद्रांक शुल्क (स्टॅम्प ड्यूटी) माफ

अर्थसंकल्पीय अधिवेशन सुरू असतानाच राज्य सरकारने राज्यातील कोट्यवधी जनतेला मोठा दिलासा दिला आहे. विशेषतः विद्यार्थी, पालकांना या निर्णयाचा फायदा होणार आहे. राज्य सरकारने प्रतिज्ञापत्रासाठी 500 रुपयांचे मुद्रांक शुल्क माफ करण्याचा निर्णय घेतला आहे.यापुढे एका साध्या कागदावर स्वसाक्षांकित (सेल्फ अटेस्टेट ) अर्ज लिहून प्रमाणपत्र तहसील कार्यालयातून मिळू शकेल.

• दहावी, बारावीच्या निकालानंतर विद्यार्थी व  पालकांचा या सर्व प्रकारच्या प्रमाणपत्रासाठी लागणारा एकूण 3 ते 4 हजारांचा खर्च वाचणार.

• *निर्णयाची तात्काळ अंमलबजावणी करण्याचे मंत्री बावनकुळे यांचे आदेश.*

Post a Comment

Previous Post Next Post