प्रेस मीडिया लाईव्ह :
विशेष प्रतिनिधी : सुनील पाटील
मी ॲड. काशिनाथ जगन्नाथ ठाकूर राखीव पोलीस निरीक्षक रोडपाली यांनी चालवलेल्या व्हीआयपी संस्कृती बद्दल मला प्राप्त झालेली माहिती मी आपणास कळविली व निदर्शनास आणू दिली असता. सहाय्यक पोलीस आयुक्त नवी मुंबई (प्रशासन) यांनी मला चौकशीसाठी बोलाविले. पण मी बाहेरगावी असल्याने त्यांनी मला स्मरणपत्र पाठवून कधी येणार याबाबत विचारणा केली. पण मुद्दा महत्त्वाचा असा आहे की माझी चौकशी करणे ऐवजी, माझ्याकडे पुष्टी देणारे कागदपत्रे मागणी करण्याऐवजी, सहाय्यक पोलीस आयुक्त नवी मुंबई प्रशासन यांनी चालवलेला तपास हाच मुळात आश्चर्यजनक/बालिश बुद्धीचा आहे. असा अर्धवट अधिकारी होणे नाही..?
1) चौकशी कामी बोलावलेल्या कर्मचाऱ्यांना विचारणे की व्हीआयपी पद्धत चालू आहे का ? तुम्हाला त्याबद्दल माहिती आहे का ?
2) जिम मॅनेजर हे राखीव पोलीस निरीक्षक यांच्या वरदहस्ताने केलेल्या दुबईवारी बद्दल चौकशी करण्या ऐवजी लागलीच तुम्ही त्यांना लाईन कमांडर बनवले व नवीन जिम मॅनेजर ची चौकशी करताय ? की तुम्ही दुबई कधी गेला होता.!! अजब आहे तुमचे सरकार !!??
मला आजही जंगम आणि जाधव मधला फरक समजतो.
मात्र जंगम आणि जाधव मधला फरक न समजायला आपण नक्कीच मूर्ख नाहीत असं माझं ठाम मतं आहे.(पण मला असे वाटते कि एकतर ठार मूर्ख आहात किंव्हा मूर्ख असल्याचा सोंग घेत आहात किंव्हा खरोखरच मूर्ख आहात, सोंग घेण्याची आवश्यकता नाही.) कदाचित मी सत्य परिस्थिती मांडून दगडावर मी माझे डोके आपटपतो आहे असे मला जाणवू लागलं आहे, कठीण आहे या देशाचं, असे अधिकारी भेटलेत कि एकास एक महाठग..!!
3) प्रोटेक्शन जनरल ड्युटी अंमलदार हे राखीव पोलीस निरीक्षक राहात असलेल्या इमारतीमधील फ्लॅटचे घर भाडे व लाईट बिल भरतात. याची सखोल चौकशी करणे गरजेचे आहे.
पण दुर्दैव आहे की जसं सर्व सहा कंपनी जनरल ड्युटी अंमलदार फक्त कागदावर ड्युटी दाखवतात प्रत्यक्षात व्हीआयपी घरीच असतात. याचा शोध घेणे ऐवजी तुम्हाला जास्त माझी चौकशी करण्यातच इच्छा दिसत आहे.!! याचा अर्थ तुम्ही पण चौकशी दरम्यान फक्त कागदी घोडे नाचवत आहात !!
आजही माझी #पोलीस_आयुक्त #नवीमुंबई यांना विनंती आहे. राखीव पोलीस निरीक्षक यांनी चालवलेली व्हीआयपी संस्कृती बद्दल जी माहिती आपल्या निदर्शनास आणून दिलेली आहे त्याची सखोल चौकशी तसेच राखीव पोलीस निरीक्षक व सहा जनरल ड्युटी अंमलदार यांची आर्थिक व्यवहारांची चौकशी होणे गरजेचे आहे. जिम मॅनेजर ची ड्युटी जिम मध्ये असताना हे महाशय दुबई ला फिरायला जात. जिम मॅनेजर च बिंग फुटलं आता ह्याच जिम मॅनेजरला लाईन कमांडर बनवले, जिम मध्ये कागदावर ड्युटीवर असताना दुबई वारी करणाऱ्या जिम मॅनेजर ला लाईन कमांडर आणि राखीव पोलीस निरीक्षक यांची सखोल चौकशी व्हावी ही नम्र विनंती.
आपला
ॲड. काशिनाथ जगन्नाथ ठाकूर
सामाजिक कार्यकर्ता
मो. 8408870500