प्रेस मीडिया लाईव्ह :
फिरोज मुल्ला सर :
इस्लाम धर्मामध्ये रमजान ईद या सनाचे मोठे महत्व आहे या महिण्यात पवित्र कुराण या ग्रंथाचे वाचन पठण मोठ्या उत्साहने व बढ्या अदबीने केले जाते कुराण हे ग्रंथ पृथ्वी तलावरील तमाम मानवासाठी औतरले आहे आणि त्याचे पैगंबर मूहमंद (स.अ.)तमाम मनवाकरिता मानवतावादी समतेचा संदेश त्यांनी दिला आहे मुस्लिम बांधव या महिण्यात तीस दिवसाचे रोजे (उपवास )धरून अल्लाहची इबादत (प्रार्थना )केली जाते रोजामुळे स्वतःला ज्या भावना जाणवतात त्याप्रति आपण माणूस आहोत याची आपल्याला जाणीव होते म्हणून दुसऱ्या माणसाबद्दल आपल्या मनामध्ये आपुलकी निर्माण होते रमजान महिन्यामध्ये विशेष करून गोरगरीब लोकांची आपल्या कुवती प्रमाणे पैसाने धान्य देवून त्यांची मदत करणे इस्लाम धर्माचा संदेश आहे म्हणून मुस्लिम बांधव ते कार्य आवर्जून करतात मनामध्ये कुठलाही द्वेष न ठेवता हिंदू,बौद्ध, ख्रिशन, जैन, पंजाबी, मातंग इतर समाजातील बांधवांना आपल्या घरी बोलावून एकत्मतेचा समानतेचा संदेश देतात व एकमेकांना गळा भेट देऊन ईद मुबारक बोलून शुभेच्छा देतात