प्रेस मीडिया लाईव्ह :
शिरोळ : सुनिल शंकर इनामदार हे ७५ व्या वर्षात पदार्पण करत आहेत. त्यांच्या विवाहाला ५० वर्षे पूर्ण झाली आहेत.या निमित्त सुनिल इनामदार, सौ. सुरेखा इनामदार यांचा अमृतमहोत्सवी सत्कार रविवारी १६ मार्च रोजी टारे क्लब हाऊस, अर्जुनवाड शिरोळ रोड, शिरोळ येथे सकाळी १०.३० वा. आयोजित केला आहे, अशी माहिती प्रा. डॉ. मोहन पाटील, संजय सुतार आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी दिली.
पाटील आणि सुतार म्हणाले, इनामदार यांनी वेगवेगळ्या वर्तमानपत्रांचे संपादक पद भूषविले होते. ते ज्येष्ठ पत्रकार आहेत. साहित्य, सामाजिक क्षेत्रात त्यांचे मोठे योगदान आहे. गरीब, कष्टकरी, श्रमीकांसाठी चळवळीत त्यांनी काम केले आहे. सौ आणि श्री. इनामदार यांनी सार्वजनिक जीवनात लोकहितासाठी आयुष्य वेचले आहे. त्यांच्या या सत्कार सोहळ्याला संपादक वसंतराव भोसले, आ. डॉ. राजेंद्र पाटील-यड्रावकर, आ. डॉ. अशोकराव माने, माजी आ. प्रकाश आवाडे, राजू शेट्टी, माधवराव घाटगे, गणपतराव पाटील, पीटर चौधरी, प्रसाद कुलकर्णी व अन्य उपस्थित राहणार आहेत, अशी त्यांनी माहिती दिली.