प्रेस मीडिया लाईव्ह :
मुरलीधर कांबळे :
शिरोळ- शिरोळ तालुक्यातील धरणगुत्ती येथे संजय अल्लाबक्ष शिकलगार (वय 38.मुळ रा.यादवनगर ,सध्या रा.लक्ष्मीनगर ,धरणगुत्ती) याचा खून करून तेथील लिंगायत स्मशानभूमीत पुरल्याची धक्कादायक घटना बुधवार (दि.05) रोजी दुकीपारी चारच्या सुमारास उघडकीस आली आहे.
हा प्रकार त्याच्या पत्नीने प्रियकराच्या मदतीने केल्याचे दिसून येते.
या घटनेची माहिती पोलिसांना मिळाली असता शिरोळ पोलिस ठाण्याचे पोलिस निरीक्षक शिवाजीराव गायकवाड,तहसीलदार अनिलकुमार यांच्यासह शासकीय अधिकारी आणि कर्मचारी यांच्या उपस्थितीत पुरलेला मृतदेह बाहेर काढ़ण्याचे काम सुरु चालू आहे.
सदरचा खून हा गुरुवार (दि.27 फ़ेब्रु) रोजी रात्रीच्या सुमारास करण्यात आला असल्याची माहिती पोलिसांना मिळाली आहे.त्या नंतर ही घटना आज बुधवारी उघडकीस आल्याने शिरोळ पोलिसांनी संशयीताना ताब्यात घेऊन मृतदेह पुरलेल्या ठिकाणी आणुन सदरचा मृतदेह बाहेर काढ़ण्याचे काम चालू आहे.घटना स्थळी ग्रामस्थांनी मोठ्या प्रमाणात गर्दी केली होती.
या घटनेने शिरोळ तालुक्यात मोठी खळबळ उडाली आहे.