प्रेस मीडिया लाईव्ह :
शिरोळ : गुरुमोल एज्युकेशन सोसायटी संचलित हॅपी इंग्लिश स्कूल शिरोळ येथे महिला दिनानिमित्त 'पालकांची शाळा 'उपक्रम राबविण्यात आला. यामध्ये पालकांचे प्रबोधन करण्यासाठी तज्ञांची मार्गदर्शन तासिका पद्धतीने आयोजित करण्यात आली होती .
प्रार्थना परिपाठ राष्ट्रगीताने कार्यक्रमाची सुरुवात झाली .त्यानंतर वक्ते अँड श्रीकांत माळकर,डॉ. पल्लवी आणुजे,सी ई ओ मकरंद देशपांडे , वक्ते मनोज सुतार यांचे पालकांसाठी उद्बोधक मनोगते झाली.
अँड.श्रीकांत माळकर यांनी' मुलांचा व्यक्तिमत्व विकास व पालकांची भूमिका 'या विषयावर मनोगत व्यक्त केले. ते म्हणाले "मुलांच्या व्यक्तिमत्व विकासाच्या जडणघडणीमध्ये शाळेबरोबर पालकही तितकेच जबाबदार आहेत .दोघांच्या समन्वयातून पाल्याचा विकास करण्यासाठी आपण कटिबद्ध रहावे."
डॉ पल्लवी आणुजे यांनी 'बालकांचे आरोग्य व आहार यांवर'मार्गदर्शन केले. त्या म्हणाल्या "सध्याच्या फास्ट पुडच्या जमान्यांमध्ये विद्यार्थ्यांनी सकस आहार घ्यावा. फास्टफूड ऐवजी दूध दुग्धजन्य पदार्थ पालेभाज्या कच्चे फळे यांचा आहारामध्ये वापर करावा .बालकांच्या आरोग्यावरच मुलांचे अध्ययन अध्यापन प्रक्रिया सुलभ होऊन गुणवत्ता वाढीसाठी शादी को मानसिक आरोग्य महत्त्वाचे आहे."
सी ई.ओ. मकरंद देशपांडे यांनी 'ट्रेन द ब्रेन' या विषयावर उद्बोधक मार्गदर्शन केले. ते म्हणाले "मानसशास्त्राच्या दृष्टीने विद्यार्थ्यांचे मेंदू हा महत्त्वाचा घटक असून विद्यार्थ्यांच्या जडणघडणीमध्ये एकाग्रता व त्यातून व्यक्तिमत्व विकास करणे गरजेचे आहे. जेवढी मनाची ताकद अधिक ,तेवढी गुणवत्ता व व्यक्तिमत्व विकास चांगल्या प्रकारे घडू शकतो"
वक्ते मनोज सुतार " मुले ही जीवनामध्ये डॉक्टर ,इंजिनिअर होणे हे प्रारब्धाचा भाग आहे, मात्र संस्करी आदर्श होणे हे पाल्याच्या व शिक्षकांच्या हातात आहे."पालकांच्या वतीने सौ.वंदना नाईक यांनी मनोगत व्यक्त केले कार्यक्रमाला डॉ.किरण आणुजे यांची उपस्थिती होती. गुरूमोल एज्युकेशन इन्स्टिट्यूट चे सचिव गुरूप्रसाद रिसबुड यांनी स्वागत केले. अलका आणुजे यांनी आभार मानले .