रायगड क्राईम : रस्त्यावर बॅगेत आढळला महिलेचा मृतदेह; अज्ञात व्यक्तीविरोधात गुन्हा दाखल

 

प्रेस मीडिया लाईव्ह :

 विशेष प्रतिनिधी : सुनील पाटील

रायगड जिल्हा पेण तालुक्यातील दुरशेत फाट्या लगत असणाऱ्या नदी कडेच्या रस्त्यावर एका बॅगेत महिलेचा मृतदेह आढळून आल्याने एकच खळबळ उडाली आहे.सदर घटनेची माहिती पेण पोलिसांना मिळताच त्यांनी घटनास्थळी धाव घेऊन पाहणी केली.यामध्ये महिलेचा खून करून मृतदेह बॅगेत कोंबला असल्याने तो पोलिसांनी शवविच्छेदनासाठी पेण उपजिल्हा रुग्णालयात आणला आहे.

मुंबई- गोवा महामार्गालगत असणाऱ्या दुरशेत फाटा रस्त्यालगत नदीच्या कडेला गेल्या तीन चार दिवसांपासून एक मोठी बॅग पडलेली ग्रामस्थांना दिसली. त्या दरम्यान गावकऱ्यांची चर्चा सुरू झाली. मात्र आज सदर बॅगेतून भयानक वास येत असल्याने अखेर ग्रामस्थांनी पोलिसांना पाचारण केले

यादरम्यान पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली असता, सदर बॅगेत एका अज्ञात महिलेचा मृतदेह आढळून आल्याने एकच खळबळ उडाली. सदर मृतदेह पोलिसांनी अपघातग्रस्तांचे वाली कल्पेश ठाकूर यांच्या मदतीने रुग्णवाहिकेद्वारे उपजिल्हा रुग्णालय येथे ठेवण्यात आले असून याबाबत पोलिसांनी अज्ञात व्यक्तीविरोधात गुन्हा दाखल केला आहे.

या प्रकरणाचा अधिक तपास पोलिस उपधीक्षक गजानन टोम्पे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस निरीक्षक संदीप बागुल, सहाय्यक पोलिस निरीक्षक निलेश राजपूत करत आहेत. याबाबत अधिक माहिती अशी की दुरशेत फाट्याजवळ मागच्या चार-पाच महिन्यापूर्वी पुरुषाचा मृतदेह आणि त्यानंतर बंदुकीच्या काही गोळ्या याच ठिकाणी सापडण्याची घटना असल्याने येथील नागरिक भयभीत झाले आहे

येथील रस्ता हा जास्त प्रमाणात रहदारीचा नसल्याने या ठिकाणी वारंवार घटना का घडत आहेत. त्यामुळे येथे सीसीटीव्ही कॅमेरे बसविण्यात यावेत अशी मागणी करत याकडे पोलिस प्रशासनाने अधिक लक्ष देणे गरजेचे असल्याचे ग्रामस्थांनी म्हटले आहे.

सदर घटनेची माहिती पोलिस प्रशासनाला ग्रामस्थांनी दिली असता तात्काळ दूरशेत फाट्याजवळील रस्त्यावरील बॅग पाहिली असता एका अज्ञात महिलेचा मृतदेह सडलेल्या अवस्थेत आढळून आला आहे.

याबाबत घटनेचा अधिक तपास करत असून यातील आरोपीला लवकरात लवकर अटक करण्यात येईल तसेच येथील रहदारीचा रस्ता सुनसान असल्याने या अगोदरही येथेच काही घटना घडलेल्या असल्याने या रस्त्यावर सीसीटीव्ही कॅमेरे लावण्याबाबत विचारविनिमय करण्यात येईल.

Post a Comment

Previous Post Next Post