प्रेस मीडिया लाईव्ह :
राज्य सरकारने २०१९ पुर्वीच्या वाहनांना हाय सेक्युरिटी नंबर प्लेट बसवणे बंधनकारक केले असून, यासाठीची नोंदणी प्रक्रिया राबवली जात आहे. राज्य सरकारने दिलेल्या निर्देशनानंतर हाय सेक्युरिटी नंबर प्लेट बसवण्यासाठी ३० एप्रिलपर्यंतची मुदतवाढ दिली आहे.आतापर्यंत पुणे शहरात केवळ ४५ हजार ५०० वाहनधारकांनी ही नंबर प्लेट बसवली आहे. याबातची आकडेवारी आरटीओकडून देण्यात आली आहे. यामुळे या नंबर प्लेटला पुणेकरांनी थंड प्रतिसाद दिल्याचे आकडेवारीवरून दिसते.
पुणे शहरात १ एप्रिल २०१९ पूर्वीची २५ लाखांहून अधिक वाहने असून, शुक्रवारपर्यंत सुमारे दोन लाख ४० हजार वाहनचालकांनी नोंदणी केली आहे. त्यापैकी केवळ ४५ हजार ५०० वाहनांना पाटी बसविण्यात आली आहे, उर्वरीत एक लाख ९५ हजार ५०० वाहनचालक प्रतीक्षेत असल्याची माहिती आरटीओकडून सांगण्यात आले आहे.
पुणे शहरातील वाहनांसाठी रोस्मार्टा कंपनीची नियुक्ती करत वाहनचालकांना तातडीने संबंधित पाटी लावण्यासाठी अॉनलाईन नोंदणी करण्याचे निर्देश देण्यात आले आहे. सुरुवातीच्या काळात अवघी ५९ केंद्रे सुरू करण्यात असून, केंद्रांवर मनुष्यबळाचा अभाव असल्याने पाटी बसवण्यास विंलब होत असल्याने वाहनचालक आणि केंद्रचालक यांच्यामध्ये वादावादीच्या घटना देखील घडल्या आहेत. या पार्श्वभूमीवर केंद्रांची संख्या वाढण्यात आली असून १२५ केंद्र करण्यात आली आहेत.