महापुरुष व महामातांची जयंती जातीत न करता सर्व जातीधर्मातील लोकांना सोबत घेऊन साजरी करावी.. फिरोज मुल्ला (सर )

 



प्रेस मीडिया लाईव्ह :

पुणे.. महामाता रमामाई भीमराव आंबेडकर राष्ट्रीय स्मारकच्या वतीने"दिलखुलास चर्चा " आयोजित करण्यात आली होती महापुरुष महामातांची जयंती अशी साजरी करावी या विषयावर दिलखुलास चर्चा कार्यक्रमाचे अध्यक्ष मा.ज्ञानेश्वर मोळक स्वागताध्यक्षा मा. लताताई राजगुरू यांच्या  उपस्थितीत घेण्यात आला यावेळी मा. फिरोजभाई मुल्ला, मा. भोलासिंग अरोरा, मा. विल्सन चंदवेळ, मा. भरत सुराणा, संदीपभाऊ शेंडगे, संकेत, श्री कांबळे, सूर्यवंशी मामा,हे सर्व जातीधर्मातील विचारवंत मान्यवरांनी आप आपले विचार व्यक्त केले या कार्यक्रमाचे आयोजन स्मारकाचे मुख्य समन्वयक विठ्ठलदादा गायकवाड यांनी केले

फिरोज मुल्ला मनोगत व्यक्त करत म्हणाले महापुरुषांना व महामातांना जातीच्या कुफनात अडकून ठेवणे म्हणजे त्यांच्या घोर अपमान आहे ते ज्या जातीत जन्मले ती जात त्यांनी कधीच घट्ट धरून ठेवली नाही सर्वधर्माचा आदरच केला. संत तुकाराम महाराज, राजमाता जिजाऊ,छत्रपती शिवाजी महाराज, महात्मा ज्योतिबा फुले, क्रांतिजोती सावित्रीबाई फुले, फातिमाबी शेख,राजर्षी शाहू महाराज, विश्वभूषण डॉ. बाबासाहेब आंबेडकर,त्यागमूर्ती रमामाई आंबेडकर,भारतरत्न अबुल कलाम आजाद, लोकशाहीर अणाभाऊ साठे, शाहीर अमर शेख,या सर्वांनी कधीच एका धर्मासाठी एका जातीसाठी कार्य केले नाही युवकांना महापूर्षांचा खरा इतिहास सांगणं काळाची गरज आहे आजच्या युगात चुकीच्या पद्धतीने इतिहास दाखवला जातोय आणि शिकवला जात आहे म्हणून देशभरात असांतता निर्माण होत चालली आहे म्हणून आपण जयंती साजरी करत असताना महापुरुषांना व महामातांना डोक्यावर घेण्या पेक्षा डोक्यात घेतले पाहिजे हे महत्वाचे म्हणजे त्यांचे मानवतावादी विचार जनतेपर्यंत पोहचतील आणि तुमचे आमचे कर्तव्य आहे अशा प्रकारची जयंती साजरी करणे खरी जयंती होईल आणि महापुरुषांना अभिवादन होईल असे मत फिरोज मुल्ला (सर )यांनी व्यक्त केले

Post a Comment

Previous Post Next Post