बोपोडी.. वी. भा. पाटील जलतरण तलाव गोर गरीब मुला मुलींकरिता पोहण्यासाठी असलेल्या जाचक अटी रद्द कराव्यात.. फिरोज मुल्ला (सर)
प्रेस मीडिया लाईव्ह :
रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया (सचिन खरात गट )या पक्षाच्या वतीने फिरोज मुल्ला (सर) मुख्य संघटक महाराष्ट्र राज्य यांच्या नेतृत्वाखाली पुणे मनपा आयुक्त राजेंद्र भोसले साहेब तसेच क्रीडा विभागाचे उपायुक्त यांना निवेदन दिले यावेळी संदीपभाऊ शेंडगे उपस्थित होते
https://youtu.be/M0CXXHbXyoM?si=3yDXKx6MzUFPMV4K
____________________________
पुणे महानगर पालिकेच्या अंतर्गत बोपोडी येथे वी.भा.पाटील जलतरण तलाव सुरु करण्यात आला आहे बोपोडी, चिखलवाडी, मानजीबाग, आंबेडकर नगर, पडाळ वस्ती,औध रोड, या परिसरामध्ये सर्वसामान्य लोक बहुसंख्येने वास्तव्यास राहत आहेत त्यांच्या मुला मुलींसाठी व त्या परिसरातील समस्त नागरिका करिता पोहण्यासाठी एकमेव तलाव आहे परंतु त्याची मासिक पासची अट ही 2500रुपये सर्वसामान्य मुला मुलींना परवडणारी नाही आणि ऐक वेळेची तिकीट बॅच सुद्धा बंद करण्यात आली आहे उन्हाळ्याच्या सुट्या मध्ये सर्वसामान्य मुला मुलींना अशा जाचक अटीमुळे सदर तलावात पोहण्याचा आनंद घेता येणार नाही त्यामुळे ते सुटयांमध्ये इतर वाईट मार्गाला लागू शकतात त्यांना ऐक शारीरिक व्यायाम मिळू शकतो सदरची अट ही अन्यकारक आहे जनतेच्या कराच्या पैसातून जळतरण तलाव उभारण्यात आलेले आहे त्यामुळे सर्व घटकातील असणाऱ्या मुला मुलींना लाभ मिळायला पाहिजे परंतु जाचक अटीमुळे सर्वसामान्य मुला मुलींना या लाभा पासून वंचीत राहावे लागत आहे यातून योग्य मार्ग काढावा आणि सर्वसामान्य मुला मुलींसाठी ही अट रद्द करून तलाव त्वरित सुरु करावे
अन्यथा आम्हाला जनहीतार्थ लोकशाही मार्गाने जनआंदोलन छेडावे लागेल असा इशारा देण्यात आला
आमच्या मागण्या खालील प्रमाणे
(1)2500 रुपये मासिक पासची जाचक अट शितील करून 1500 रुपये करावी (2) तिकीट बॅच बंद आहे ती सुरु करावी (3) मुला मुली सोबत पोहण्याच्या वेळी त्याच्या वडीलधारकाचे आधारकार्ड सहित तपासणी करून स्वतः उपस्तितीत राहणे बंदन कारक करणे