एसटी बसच्या धडकेत दुचाकीस्वार तरुणाचा मृत्यू

 


प्रेस मीडिया लाईव्ह :

पुणे : एसटी बसच्या धडकेत दुचाकीस्वार तरुणाचा मृत्यू झाल्याची घटना पर्वती पायथा परिसरात घडली आहे. याप्रकरणी एसटी बसचालकाववर पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. विजय गोपाळ गेजगे (रा.पर्वती पायथा) असे मृत्यू झालेल्या तरुणाचे नाव आहे. याबाबत गेजगे यांचा मित्र आशिष मारुती भालेराव (वय ३४, रा. जनता वसाहत, पर्वती पायथा) यांनी पर्वती पोलीस ठाण्यात तक्रार दिली आहे. त्यानुसार, एसटी बसचालकावर गुन्हा दाखल केला आहे.

पोलिसांच्या माहितीनुसार, दुचाकीस्वार गेजगे पर्वती पायथा परिसरातून मंगळवारी (४ मार्च) रात्री पावणेदहाच्या सुमारास निघाले होते. पर्वती पायथा परिसरात त्यांनी दुचाकी थांबविली. रस्त्याच्या कडेला ते दुचाकी लावत होते. दुचाकी लावताना त्यांचा अचानक तोल गेला आणि ते रस्त्यावर पडले. त्या वेळी पाठीमागून येणाऱ्या भरधाव एसटी बसचे चाक त्यांच्या दोन्ही पायांवरुन गेले. गंभीर जखमी झालेल्या गेजगे यांना तातडीने नागरिकांनी रुग्णालयात दाखल केले. या घटनेची माहिती मिळताच पोलिसंनी घटनास्थळी भेट दिली. अपघातानंतर घटनास्थळी न थांबता एसटी बसचालक पसार झाला. उपचारादरम्यान गेजगे यांचा रुग्णालयात मृत्यू झाला. सहायक पोलीस निरीक्षक राहुल नामदे अधिक तपास करत आहेत.

Post a Comment

Previous Post Next Post