पुणे मनपा साह्यक आयुक्त मा. गिरीष दापेकर साहेब यांना रिपाई (सचिन खरात गट )पक्षाच्या वतीने मागण्यांचे निवेदन

 बोपोडी मुस्लिम(कब्रस्थान) दफनभूमी मध्ये सुविधासाठी वाढीव बजेटची तरतूद तातडीने करावी.. फिरोज मुल्ला (सर )




रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया (सचिन खरात गट )या पक्षाच्या वतीने मुख्य संघटक महाराष्ट्र राज्य फिरोज मुल्ला (सर )यांच्या नेतृत्वाखाली पुणे मनपा औध क्षेत्रीय कार्यालयाचे साह्यक आयुक्त मा.गिरीष दापेकर साहेब यांना समक्ष भेटून निवेदन देण्यात आले तसेच पुणे मनपा आयुक्त मा.राजेंद्र भोसले साहेब यांची भेट न झाल्यामुळे त्यांच्या कार्यालयात निवेदनाची प्रत देण्यात आली बोपोडी येथील मुस्लिम कब्रस्थान  मधील सुविधासाठी निवेदन देण्यात आले यावेळी युवा नेते संदीपभाऊ शेंडगे उपस्थित होते 

बोपोडी येथील मुस्लिम (कब्रस्थान )दफनभूमी मध्ये पाण्याची व्यवस्था ही अपुरी पडत असल्यामुळे पाण्याची कमतरता भासत आहे त्यामुळे तेथील काम करण्यास अडचण होत आहे म्हणून त्या ठिकाणी पाण्याकरिता बोर मारण्याची व्यवस्था करणे गरजेचे आहे जेणेकरून पाण्याची कमतरता भासणार नाही तसेच दफनभूमीला चारपदरी असणारी संवरक्षण भिंत नसल्यामुळे पावसाळ्यात प्रचंड प्रमाणात दफनभीमीत पाणी साचत आहे त्यामुळे चिखल होत असल्यामुळे त्या काळात मयत दफन करण्यासाठी मुस्लिम बांधवांना नाहक त्रास सहन करावा लागत आहे त्यामुळे संवरक्षण भिंत बांधणे काळाची गरज आहे तसेच रंगरगोटीच्या माध्यमातून मोठ मोठ्या झाडांच्या बुंध्याला कलर मारलेला नाही तोही कलर मारण्यात यावा या सारख्या अडचणी त्या ठिकाणी निर्माण झाल्या आहेत तरी सदरील कामाकरिता आपण तातडीने वाढीव बजेटची तरतूद करून बोपोडीतील मुस्लिम दफनभूमी करिता सहकार्य करावे यासाठी रिपाई (सचिन खरात गट )या पक्षाच्या वतीने निवेदन देऊन मागणी करण्यात आली

Post a Comment

Previous Post Next Post