प्रेस मीडिया लाईव्ह :
मुस्लिम बांधवांसाठी महत्त्वपूर्ण असलेल्या पवित्र रमजान महिन्याची सुरुवात झाली असून या काळात आपले हद्दीतील वेल्हे पोलीस स्टेशन येथील साखर गावातील समाजकंटकांनी कट रचून मुस्लिम धर्मियांचे ताराबीह नमाजीचे वेळ साधून जीवे मारण्याच्या उदेशाने हल्ला करून प्रार्थना स्थळ असलेल्या मशिदीची तोडफोड व जाळण्याचा प्रकार करून धार्मिक तेढ निर्माण व दहशत केली आहे.
या संदर्भामध्ये दोषी असणाऱ्या सर्व संबंधितांवर कठोर गुन्हे दाखल करून त्यांच्यावर अटकेची कारवाई करावी अशी मागणी सदर निवेदनाद्वारे आणि आपल्याकडे करीत आहोत.
या प्रकारची घटना जिल्ह्यामध्ये अन्य कोणत्याही ठिकाणी होवु नये यासठी खालील प्रमाणेचे कारवाई करावी हि विनंती.
१) यापूर्वी ज्या ठिकाणी तनावाची परिस्थिती निर्माण झाली होती त्या ठिकाणच्या मस्जिदींना आवश्यक ते पोलीस संरक्षण देण्यात यावे.
२) धार्मिक ध्रुवीकरण करणार्या समाजकंटकांवर प्रतिबंधात्मक कारवाई करण्यात यावी.
३) सोशल मीडियाच्या माध्यमातून सामाजिक तणाव करणाऱ्या समाजकंटकांवर विशेष लक्ष देऊन कठोर कारवाई करावी.
४) खोट्या अफवा पसरून धार्मिक ध्रुवीकरण करणाऱ्या लोकांवर देखील कठोर कारवाई करावी.
वरिल प्रमाणेच्या विनंती आम्ही आपणाकडे करीत आहोत.
तसेच माननीय महोदय , रमजान महिन्याच्या पार्श्वभूमीवर कोणताही सामाजिक तणाव निर्माण होऊ नये यासाठी सर्व पोलीस ठाण्याचे प्रभारी अधिकारी यांना सर्व मज्जिद प्रमुख व परिसरातील प्रतिष्ठित नागरिक यांची संयुक्त बैठक घेऊन योग्य त्या कारवाई बाबतच्या सूचनांची आदान प्रदान करावी असे आदेश आपण संबंधितांना द्यावेत ही विनंती.
असे निवेदन आज पोलीस अधीक्षक पुणे ग्रामीण मा. पंकज देशमुख यांना देण्यात आले याप्रसंग राहुल डंबाळे ( नॅशनल कॉन्फरन्स फॉर मायनॉरिटी ), अंजुम इनामदार अध्यक्ष मूलनिवासी मुस्लिम मंच, डॉ. सिध्दार्थ धेंडे ( माजी उपमहापौर पुणे ) सादिक शेख ( सामाजिक कार्यकर्ता सातारा ) शहाबुद्दीन शेख, सालार शेख, इब्राहिम यवतमाळ वाला, आसिफ शेख इत्यादी मान्यवरांनी निवेदन दिले.
अधिक माहितीसाठी संपर्क करा अंजुम इनामदार
9028402814