प्रेस मीडिया लाईव्ह :
पुणे : 'शांताई संस्था आयोंजित' 'स्वाभिमान महिला दिवस व स्वाभिमान महिला पुरस्कार-२०২৬ सोहळा जागतिक महिला दिनाचे औचित्य साधून अण्णाभाऊ साठे सभागृह, येरवडा, पुणे येथे साजरा करण्यात आला.
कार्यक्रमाच्या अध्यक्षा उषा वाजपेयी यांच्या सह उपस्थित मान्यवरांनी दीप प्रज्वलन केले. कार्यक्रमाची प्रस्तावना बापू कांबळे अध्यक्ष शांताई संस्था यांनी केली. राजमाता । राष्ट्रमाता जिजाऊ पुरस्कार २०२५ देऊन सौ. संजिला बापूसाहेब पठारे यांचा सन्मानकरण्यात आला. तसेच त्यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा देण्यात आल्या. त्यांच्या हस्ते महिलांचा साडी देऊन सन्मानित करण्यात आले.
क्रांतीज्योती सावित्रीबाई पुरस्कार-२०२५ डॉ. मानसी जाधव यांना प्रदान करण्यात आला. आरोग्य क्षेत्रात उल्लेखनीय कार्य केल्याबद्दल माता रमाई पुरस्कार २०२५ मा.लताताई राजगुरु माजी नगरसेविका पुणे म.न.पा. यांना देण्यात आला. सौ. फरजाना अय्युब शेख माजी नगरसेविका यांना पहिली मुस्लीम शिक्षिका फातिमाबी पुरस्कार-२०२५ देऊन सन्मानित करण्यात आले. स्वाभिमानी महिला पुरस्कार-२०२५ सौ. लायन आनिता रविजी अग्रवाल अनुर्वी फाऊंडेशन यांना प्रदान करण्यात आला.
प्रमुख वक्त्या विशेष अतिथी विश्वसुंदरी साहित्यीक व लेखिका डॉ. प्रचिती पुडे यांनी आपल्या भाषणात "महिलांनी आपल्या पायावर उभे राहावे आणि आपल्या समजाची सेवा करावी, स्वयंम शिस्त व मनलाऊन काम केल्यास आपलं ध्येयय गाठता येत". असे त्यांनी उपस्थित मार्गदर्शनपर भाषणात दिला. प्रमुख पाह्णे म्हणून सह. आयुक्त समाज कल्याण विभाग श्री. विशाल लोंढे हे उपस्थित होते. अनेक मान्यवर या कार्यक्रमासाठी उपस्थीत होते.
रॉयल संगीत सरगम, और्केस्ट्रा, ने सोहळ्यास रंगत आली. गायक मा. रफिक जी. वागवान, संजय भोसले सुप्रसिद्ध गायिका विद्या गड़करी, मनिषा गायकवाड यांच्या सह अनेक कलाकारांनी आपली गीते सादर केली. कार्यक्रमाचे सूत्र संचालन रश्मीताई कांबळे यांनी केले.