किसानपुत्र आंदोलनाने पुण्यात व्यक्त केली शेतकरी आत्महत्या थांबविण्यासाठी अन्नत्याग सहवेदना

 

प्रेस मीडिया लाईव्ह :

 पुण्यात दिनांक १९ मार्च रोजी कै. साहेबराव करपे स्मृतीप्रित्यर्थ  बालगंधर्व झाशीच्या राणीच्या पुतळ्याजवळ किसानपुत्र आंदोलनाने शेतकरी आत्महत्या झालेल्या बांधवांना श्रद्धांजली अर्पण करून अन्नत्याग आंदोलन सहवेदना व्यक्त केली. राज्यात रोज ८ शेतकरी आत्महत्या करत आहे. दरवर्षी आत्महत्या करणाऱ्या शेतकऱ्यांची संख्या वाढत आहे. शेतकरी आत्महत्या या शेतकरी विरोध नरभक्षी कायद्यांमुळे होत आहे. १९ मार्च हा सहवेदना दिवस म्हणून पुणे जिल्ह्यातील किसानपुत्रांनी दिवसभर  आपापल्या कामाच्या ठिकाणी त्यांनी अन्नत्याग करून उपवास केला. सायंकाळी पाच वाजता सर्व किसानपुत्र हे बालगंधर्व चौकात पुतळ्याजवळ जमा होऊन शेतकरी आत्महत्या झालेल्या शेतकऱ्यांना श्रद्धांजली अर्पण करुन उपवास सोडला.

आर्थिक परिस्थिती कडे दुर्लक्ष होण्यासाठी सरकार फालतू मुद्दे वर चर्चा करत असतात हे मत किसानपुत्र आंदोलनाचे मार्गदर्शक राजू बसर्गेकर यांनी आपल्या मनोगत व्यक्त करतांना मांडले. राज्यात शेतकरी संकटात असतांना त्याकडे सर्व सामान्य जनतेचे लक्ष जाऊ नये म्हणून इतर विषयावर जनतेचे लक्ष विचलित करत आहे. 

 पुण्यातील विविध भागातून आलेले किसानपुत्र उपस्थित होते. ऍड. महेश गजेंद्रगडकर, नितीन राठोड, विनायक मोहोकार - अकोट, विक्रम कदम - लातूर, शिवाजी खेडकर, राजणगाव, एस.पी.साबळे, राम माने, मकरंद डोईजड, मयुर बागुल, अंनत देशपांडे, राजीव बसर्गेकर, राजेंद्र नवले, सलीम शेख, नितीन शिंदे, विश्वास सूर्यवंशी, अस्लम सय्यद, अमित सिंग, प्रशांत शिनगारे, बाळासाहेब चव्हाण व नितीन पवार, सचिव - हमाल पंचायत, पुणे यांनी देखील संपूर्ण दिवस उपवास करुन शेतकऱ्यांना श्रद्धांजली अर्पण केली. 

किसानपुत्र आंदोलन येणाऱ्या काही दिवसात पुण्यात कायदयांचा अभ्यास करणाऱ्या युवक व युवती साठी एक दिवसाचे शिबीर आयोजन करणार अशी माहिती मयुर बागुल, राज्य समन्वयक, किसानपुत्र आंदोलन यांनी दिली.

Post a Comment

Previous Post Next Post