आज पासून आयपीएलचा थरार सुरू काही तास बाकी क्रिकेट प्रेमीचे उत्साह शिगेला.

  भव्य दिव्य उद्घाटन सोहळ्यात सुप्रसिद्ध गायिका श्रेया घोशाल सह अभिनेत्री दिशा पाटणी,करण औजला यांचा दमदार कार्यक्रमाने सुरूवात कोलकात्याच्या ईडन गार्डन्स स्टेडियममध्ये कोलकाता आणि बेंगळुरू यांच्यात उद्घाटन सामना रंगणार आहे.                

प्रेस मीडिया लाईव्ह 

चंद्रशेखर पात्रे :

 पुणे दि : आज पासून आयपीएलचा हंगाम सुरू क्रिकेट प्रेमीचे उत्साह शिगेला पोहोचली आहे २०२५ चार आज पहीला सामना केकेआर विरुद्ध आसीबी यांच्यात पहिला सामना रंगणार आहे  यंदाचा आयपीएलचा १८ वा हंगाम असणार आहे.  कोलकात्यातील इडन गार्डन्स स्टेडियमवर कोलकाता नाईट रायडर्स  आणि रॉयल चॅलेंजर्स बंगळूरू यांच्या सामन्यानं आयपीएल २०२५ ची सुरुवात होणार आहे. हा सामना कोलकाताच्या ईडन गार्डन्स येथे आजपासून खेळला जाईल.

            पहिल्या सामन्यावर पावसाचं सावट...

कोलकात्याच्या ईडन गार्डन्स स्टेडियममध्ये कोलकाता आणिबेंगळुरू यांच्यात उद्घाटन सामना रंगणार आहे. मात्र, भारतीय हवामान खात्याने  २० ते २२ मार्चदरम्यान कोलकाता आणि पश्चिम बंगालच्या काही भागांसाठी ऑरेंज अलर्ट जारी केला आहे. पावसाच्या शक्यतेमुळे स्टेडियमच्या मैदानावर ताडपत्री टाकण्यात आली आहे. आयोजकांनी हवामान विभागाच्या अंदाजानुसार पर्यायी योजना तयार केल्या असून, पावसाचा सामना सुरक्षितरित्या पार पाडण्यासाठी सर्व खबरदारी घेतली जात आहे. आयएमडी च्या ताज्या अंदाजानुसार, कोलकात्यात २२ मार्च रोजी संध्याकाळी पावसाची शक्यता ७०% आहे. तापमान २४°C ते २९°C दरम्यान राहिल. तर वारा ताशी ३०-४० किमी वेगाने वाहण्याची शक्यता आहे. गडगडाटी वारे आणि पाऊस सामना सुरू होण्याच्या वेळी होऊ शकतो. त्यामुळे पहिल्या सामन्याला सुरुवातीला विलंब होऊ शकतो किंवा काही षटकांचा सामना होण्याची शक्यता आहे.

केकेआर ने २० वेळा विजय तर आरसीबी यांनी १४ सामने जिंकून विजय 

दोन्ही संघांच्या रेकॉर्डवर नजर टाकल्यास, केकेआरने वरचढ कामगिरी केली आहे. अजिंक्य रहाणेच्या नेतृत्वाखालील केकेआर संघ बराच संतुलित आहे. पण तरीही, त्यांना आरसीबीकडून कठीण आव्हान मिळू शकते. या दोन्ही संघांमध्ये आतापर्यंत एकूण ३४ सामने खेळले गेले आहेत. या काळात कोलकाता नाईट रायडर्सने २० सामने जिंकले आहेत. तर आरसीबीने १४ सामने जिंकले आहेत. अशाप्रकारे केकेआरचा वर्चस्व दिसते.

भव्य दिव्य उद्घाटन सोहळ्याची जय्यत तयारी

कोलकात्यातील ईडन गार्डन्समध्ये आयपीएल २०२५ च्या उद्घाटन सोहळ्यासाठी भव्य तयारी करण्यात आली आहे. या सोहळ्यात श्रेया घोषाल, करण औजला, आणि दिशा पटानी यांचे दमदार परफॉर्मन्स पाहायला मिळणार आहेत. हा सोहळा संध्याकाळी ६:०० वाजता सुरू होणार असून त्यानंतर रात्री ७:३० वाजता पहिला सामना रंगणार आहे.


६५ दिवसांत ७४ सामने


ही स्पर्धा लीग स्वरूपात खेळवली जाईल, जिथे सर्व संघ एकमेकांशी दोनदा आमनेसामने येतील. यावेळी स्पर्धेत एकूण ७४ सामने होतील, जे भारतातील १३ वेगवेगळ्या ठिकाणी होणार आहेत. दोन महिन्यांहून अधिक काळ आयपीएलची धमाल क्रिक्रेटप्रेमींना अनुभवायला मिळणार आहे. या मोसमात १२ दिवसांमध्ये दररोज दोन सामने खेळले जाणार आहेत. दिवसाचा सामना दुपारी ३:३० वाजता सुरू होईल. तर रात्रीचा सामना रात्री ७:३०  वाजता सुरू होणार आहे.          प्लेऑफचे वेळापत्रक


आयपीएलच्या वेळापत्रकानुसार ५८ दिवसांच्या कालावधीत आयपीएलच्या १० संघांमध्ये ७० लीग सामने खेळले जाणार आहेत. साखळी सामन्यांमधील शेवटचा सामना मंगळवारी, १८ मे ला लखनौ सुपर जायंट्स आणि सनरायझर्स हैदराबाद या संघांमध्ये खेळला जाणार आहे. त्यानंतर टॉप दोन संघांमध्ये २० मे ला पात्रता फेरीचा पहिला सामना  खेळला जाईल. तर बाद फेरीचा सामना २१ मेला खेळला जाणार आहे. दोन्ही सामने हैदराबादमध्येच होणार आहेत. पात्रता फेरीचा दुसरा सामना २३ मे ला कोलकात्यात खेळला जाणार आहे. त्यानंतर आयपीएलचा अंतिम सामना २५ मे ला कोलकात्यातच रात्री ७:३० वाजता रंगणार आहे.


नवीन खेळाडू किती...?


मेगा लिलावात १० फ्रँचायझींनी ६३९.१५ कोटी रुपये खर्च करून १८२ खेळाडूंना खरेदी केले. भारतातील १२० खेळाडूंची विक्री झाली तर १० संघांनी ६२ परदेशी खेळाडूंना जोडले. पंजाबने सर्वाधिक २१ नवीन खेळाडू खरेदी केले, तर कोलकाताने ८ नवीन खेळाडू खरेदी केले.


यंदा हंगामात नवीन काय..?


आयपीएलच्या इतिहासात पहिल्यांदाच खेळाडूंना पगाराव्यतिरिक्त सामना शुल्क मिळणार आहे. इंडियन प्रीमियर लीग (आयपीएल) च्या १७ वर्षांच्या इतिहासात बीसीसीआय पहिल्यांदाच क्रिकेटपटूंना मॅच फी देणार आहे. भारतासोबतच परदेशी खेळाडूंनाही सामने खेळण्यासाठी शुल्क दिले जाईल.


कर्णधार आणि संघ...


साल २०१९ नंतर पहिल्यांदाच एकाच संघात परदेशी कर्णधार असण्याची ही घटना घडली आहे. फक्त हैदराबादचे नेतृत्व ऑस्ट्रेलियाच्या पॅट कमिन्सकडे आहे. उर्वरित ९ संघांमध्ये भारतीय कर्णधार आहेत. यंदा ५ संघ नवीन कर्णधारांसह खेळत आहेत. गुजरात टायटन्सचा कर्णधार शुभमन गिल (२५ वर्षे) हा सर्वात तरुण आहे, तर कोलकाता नाईट रायडर्सचा अजिंक्य रहाणे (३६ वर्षे) हा सर्वात वयस्कर कर्णधार आहे.


१) चेन्नई सुपर किंग्स (CSK): रुतुराज गायकवाड

२) गुजरात टायटन्स (GT): शुभमन गिल

३) मुंबई इंडियन्स (MI): हार्दिक पंड्या

४) पंजाब किंग्स (PBKS): श्रेयस अय्यर

५) राजस्थान रॉयल्स (RR): संजू सॅमसन

६) सनरायझर्स हैदराबाद (SRH): पॅट कमिन्स

७) रॉयल चॅलेंजर्स बेंगळुरू (RCB): रजत पाटीदार

८) कोलकाता नाइट रायडर्स (KKR): अजिंक्य रहाणे

९) लखनौ सुपर जायंट्स (LSG): ऋषभ पंत

१०) दिल्ली कॅपिटल्स (DC): अक्षर पटेल


आयपीएल २०२५  लाईव्ह स्ट्रीमिंग : कुठे आणि कसं पाहाल?


आयपीएल २०२५  चे थेट प्रक्षेपण टीव्ही आणि ऑनलाईन प्लॅटफॉर्म्सवर उपलब्ध असणार आहे. टीव्ही ब्रॉडकास्ट वर सर्व सामने स्टार स्पोर्ट्स नेटवर्कवर थेट पाहता येतील तर सामन्याचे ऑनलाइन स्ट्रीमिंग जिओहॉटस्टार अ‍ॅप आणि वेबसाइटवर पाहता येईल. महत्त्वाचं म्हणजे, यंदा जिओहॉटस्टारवर आयपीएल पाहण्यासाठी प्रेक्षकांना पेड सबस्क्रिप्शन घ्यावं लागणार आहे. म्हणजेच, आयपीएल २०२५ चे लाईव्ह स्ट्रीमिंग पूर्णपणे मोफत नसेल.

Post a Comment

Previous Post Next Post