प्रेस मीडिया लाईव्ह :
पुणे : सार्वजनिक ठिकाणी लघुशंका आणि लज्जास्पद वर्तन करणाऱ्या गौरव अहुजावर कठोर कारवाई करावी,या मागणीसाठी पतित पावन संघटनेने लक्ष्मी नारायण चौक (स्वारगेट) येथे आंदोलन केले.पतित पावन संघटनेने या प्रकारच्या असंस्कृत व अप्रिय वर्तणुकीला कडवा विरोध करून समाजातील मानवी हक्कांचे उल्लंघन करणाऱ्या व्यक्तींच्या विरोधात ठोस कारवाईची मागणी केली आहे.यावेळी पतित पावन संघटना पुणे जिल्हा अध्यक्ष दिनेश भिलारे, जिल्हा उपाध्यक्ष प्रवीण झवर,शहर कार्याध्यक्ष धनंजय क्षीरसागर,रवींद्र भांडवलकर,सरचिटणीस ललित खंडाळे,उपाध्यक्ष प्रसाद वाईकर,खडकवासला विभाग प्रमुख विजय क्षीरसागर,कसबा विभाग प्रमुख योगेश वाडेकर,छत्रपती शिवाजीनगर विभाग अध्यक्ष कारकूड,कसबा विभाग संपर्क प्रमुख स्वप्नील आंग्रे,गणेश बिबवे,हेमंत शिरोळे, संकेत पोटे,संजय कुडकर,शिवराज निवदेकर,यश चव्हाण,भारत मिसाळ,योगेश शिर्के,मंगेश शेलार,हर्षद हरपूडे उपस्थित होते.
संघटनेचे संतोष गुरु यांनी आपल्या भाषणात या घटनेच्या विरोधात तीव्र प्रतिक्रिया दिली.ते म्हणाले,'सार्वजनिक ठिकाणी महिलांना असुरक्षित वाटू देणाऱ्या अशा प्रकारच्या वाढत्या घटनांना आळा घालण्यासाठी तात्काळ कायदेशीर कार्यवाही व्हावी व माननीय कोर्टानी त्याला पुणे शहरातील सर्व सार्वजनिक शौचालय साफ करण्याची शिक्षा केली पाहिजे.हा प्रकार पूर्णपणे समाजाच्या संस्कार आणि शिष्टाचाराच्या विरोधात असून अशा वर्तनामुळे महिलांच्या सन्मान,समाजाच्या शांती आणि सुव्यवस्थेसाठी हानीकारक आहे.गौरव अहुजा याच्यावर त्वरित कठोर कारवाई केली जावी, तसेच अशा प्रकारच्या घटनांमुळे समाजात उद्भवणाऱ्या असुरक्षिततेला यथाशक्ती प्रतिबंध केला जावा.पतित पावन संघटना यापुढे देखील समाजातील असंस्कृत वर्तनाच्या विरोधात लढत राहील आणि महिलांच्या हक्कांचे रक्षण करेल'.हे आंदोलन नुकतेच ९ मार्च २०२५ रोजी झाले.
.