प्रेस मीडिया लाईव्ह :
पूणे : काल धंनजय मुंडे यांनी आजाराच्या कारणास्तव मंत्रीपदाचा राजीनामा दिल्यावर आज बुधवार रोजी पुण्यात डॉ आंबेडकर पुतळा , जिल्हा अधिकारी कार्यालयाजवळ आम आदमी पार्टी तर्फे आक्रोश आंदोलन करण्यात आले.
महाराष्ट्रातील कायदा व सुव्यवस्थेची परिस्थिती दिवसेंदिवस ढासळत चाललेली असून याचा फटका सर्वसामान्य जनतेला बसत आहे. सत्तेच्या नादात सामान्य माणसाला या शासनाकडून काय अपेक्षित आहे हेच शासन विसरले आहे. बीड मधील सरपंच संतोष देशमुख यांची हत्या ज्या वाल्मीक कराड ने केलेली आहे तो वाल्मिक कराड, मंत्री धनंजय मुंडे जवळचा सहाय्यक , व्यवसायिक भागीदार असून आर्थिक खंडणी च्या कारणास्तव ही हत्या झालेली आहे. यातील आर्थिक व्यवहारचे आकडे भाजप च्याच आमदारांनी मांडलेले आहेत. म्हणूनच धनंजय मुंडे यांना देखील या प्रकरणात वाल्मिक कराड सोबत सह आरोपी करावे व त्या अनुषंगानेच इडी ने आर्थिक गैरव्यवहार प्रतिबंधक कायदा (पीएमएलए) अंतर्गत गुन्हे नोंदवावे अशी मागणी यावेळी करण्यात आली.
केवळ सत्तेसाठी एकत्र आलेल्या नीतीभ्रष्ट लोकांचे सरकार असून धनंजय मुंडे सह संजय राठोड, तानाजी सावंत, माणिकराव कोकाटे, छगन भुजबळ, अजित पवार, राणे, जयकुमार गोरे अश्या सर्व कलंकित, भ्रष्ट प्रवृत्तीच्या नेत्यांना देवेंद्र फडणवीस पाठीशी घालत आहेत. राज्यात मागील काही काळामध्ये महिला अत्याचारच्या अनेक घटना घडलेल्या असून या सर्व केसेस फास्टट्रॅक कोर्टामध्ये चालवल्या जाव्यात अशीही मागणी यावेळी करण्यात आली.
यावेळी आंदोलनात आम आदमी पार्टीचे राज्य प्रवक्ते मुकुंद किर्दत, शहर अध्यक्ष सुदर्शन जगदाळे, धनंजय बेनकर, निखिल खंदारे, शिवाजी डोलारे, सुभाष करांडे, गजानन भोसले, संदेश दिवेकर, शीतल कांडेलकर, सचिन गरुड, कुमार धोंगडे, मनोज शेट्टी, मनोज एरंडकर, गुणाजी मोरे, अमित म्हस्के, उमेश बागडे, किरण कांबळे, नौशाद अन्सारी, प्रशांत कांबळे, सुरेखा भोसले, संजय कटारनवरे, इम्रान खान, मंगेश आंबेकर, विकास चव्हाण, सोमनाथ भगत, शंकर थोरात, सतीश यादव, चंद्रकांत गायकवाड, अभिजीत बागडे, निलेश वांजळे, अली सय्यद व इतर कार्यकर्ते मोठ्या संख्येने सहभागी झाले होते.
- मीडिया टीम, आम आदमी पार्टी