पुणे पोलीसांच्या कार्यपद्धती वर पुन्हा प्रश्न चिन्ह निर्माण, ड्रग माफिया ललित पाटील सारखी पुर्नआवृत्ती .
प्रेस मीडिया लाईव्ह :
चंद्रशेखर पात्रे :
पुणे दि :- ससुन रुग्णालयातुन गंभीर आरोप असलेल्या आरोपीने पोलीसांच्या हातावर तुरी देऊन पलायन केले आहे यामुळे पुणे पोलीसांनवरती प्रश्न चिन्ह निर्माण झाले आहे ससून रुग्णालया मध्ये उपचार सुरू असताना गंभीर गुन्ह्यातील आरोपीने पलायन केल्याची माहिती समोर आली आहे. संतोष सचिन साठे असे ससून रुग्णालयातून पळून गेलेल्या आरोपीचे नाव आहे. आरोपी संतोष साठे याच्याविरोधात कराड पोलीस स्थानकामध्ये ३५४ अन्वये गुन्हा दाखल आहे.
साठे याच्यावर सध्या पुण्याच्या असून रुग्णालयात वैद्यकीय उपचार सुरू होते. उपचार सुरू असताना पोलिसांच्या देखदेखीखाली असलेला साठे याने सकाळी ससून रुग्णालयातून पलायन केले. दरम्यान याप्रकरणी आरोपी संतोष साठे विरोधात बंडगार्डन पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या घटनेने पोलिसांच्या कार्यपद्धतीवर प्रश्न उपस्थित केले जात आहेत. याअगोदरही ड्रग्स माफिया ललित पाटील ससून गेल्याची घटना घडली होती. गंभीर आरोप असलेल्या आरोपी पसार झाल्याने नागरिकांन मध्ये उलटसुलट चर्चा रंगली आहे
पुण्यासह पश्चिम महाराष्ट्रातले कुख्यात गुन्हेगार येरवडा कारागृहात ठेवले जातात. त्यांना वैद्यकीय तक्रारी असतील तर त्यांच्यावर ससून रूग्णालयात उपचार केले जातात. पण या सुविधेचा गुन्हेगार गैरवापर करत असल्याचे दिसून येत आहे.