प्रेस मीडिया लाईव्ह :
पूणे : भारती विद्यापीठ पोलीस स्टेशनच्या हद्दीत एका तरुणीवर बलात्काराची घटना घडली. ओळखीचा गैरफायदा घेत तरुणीवर बलात्कार केला. इतकच नव्हे तर तिला सोशल मीडियातून वारंवार धमकी दिली जात आहे. असा आरोप पीडित तरुणीने केला आहे. या प्रकरणी भारती विद्यापीठ पोलीस स्टेशन मध्ये आरोपी सिद्धांत रणधीर याच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
तरुणीने तक्रार करुन वीस दिवस झाले आहेत. मात्र, अद्याप आरोपीला अटक करण्यात आली नाही. पीडित तरुणीला आरोपी सोशल मीडियाच्या माध्यमातून वारंवार धमकी देत आहे. तसेच तिच्या मोबाईल क्रमांकावर अश्लील फोटो सुद्धा आरोपीकडून पाठवण्यात आले. यावर पोलिसांनी लवकरात लवकर आरोपीला अटक केली जाईल आणि कठोर कारवाई केली जाईल असे म्हटले आहे.
14 वर्षीय विद्यार्थीनीवर रिक्षा चालकाने अत्याचार
यवतमाळच्या आर्णीमध्ये एका 14 वर्षीय विद्यार्थीनीवर रिक्षा चालकाने अत्याचाराचा प्रयत्न केला. यावेळी विद्यार्थीनीने आरडाओरड केल्याने एका व्यक्तीने तिला शाळेबाहेर सोडलं. त्यानंतर विद्यार्थीनीच्या तक्रारीवरून आरोपीविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
बदलापूरमध्ये दोन मुलींवर लैंगिक अत्याचार केल्याचा आरोप असलेला आरोपी अक्षय शिंदे याच्या कथित चकमकीचा अपघाती मृत्यू म्हणूनच तपास करणार का? अशी विचारणा उच्च न्यायालयाने राज्य सरकारला केली. या प्रकरणाची अपघाती मृत्यू म्हणून नोंद करण्यात आली असून गुन्हे अन्वेषण विभागातर्फे स्वतंत्र चौकशी सुरू आहे. या चौकशीअंती याप्रकरणी गुन्हा दाखल करायचा की नाही याचा निर्णय घेतला जाईल, या आपल्या भूमिकेचा राज्य सरकारच्या वतीने वरिष्ठ वकील अमित देसाई यांनी बुधवारी झालेल्या सुनावणीच्या वेळी पुनरुच्चार केला.