प्रेस मीडिया लाईव्ह :
पुणे शहरामध्ये लाखो विद्यार्थी आपल्या भविष्याची स्वप्न घेऊन येतात.शहरातील अनेक संस्था या विद्यार्थ्यांचं भवितव्य घडवतात, त्यांच्या आयुष्याला दिशा अन् कलाटणी देतात. या शिक्षणसंस्थांपैकीच एक सर्वात नामवंत शिक्षणसंस्था सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ आहे. मात्र, सध्या पुण्यातील हे नामवंत विद्यापीठ वेगळ्याच एका कारणाने चर्चेत आलंय.
सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठामधील मुलींच्या वसतिगृहात मद्य सापडल्याचा धक्कादायक प्रकार समोर आलाय. विद्यापीठाच्या मुलींच्या वसतिगृहात मोठ्या प्रमाणात दारूच्या बाटल्या सिगरेटची पॉकेटचे फोटो आणि विडिओ समोर आले आहेत. वसतिगृहात वास्तव करत असलेल्या एका विद्यार्थीनीने या सर्व गैरप्रकारची माहिती वसतिगृह महिला अधिकारी यांच्याकडे वारंवार केली होती. परंतु संबंधित अधिकाऱ्यांनी कोणती कारवाई केली नाही. त्यानंतर संबंधित विद्यार्थीनी प्रभारी कुलसचिव आणि कुलगुरू यांना पत्र लिहून हा सर्व घटनाक्रम सांगितला आहे.सगळ्यात महत्त्वाचे मुलींच्या वसतिगृह गेटवर बायोमेट्रिक उपकरणे आहेत, असे असताना येवढ्या मोठ्या प्रमाणात दारू आणि इतर नशेच्या गोष्टी आत कशा जातात? अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेच्यावतीने लेखी पत्र व्यवहार करून या सर्व प्रकारावर चौकशी समिती गठित करण्याची कुलगुरूंना विनंती करण्यात आलीय. या सर्व प्रकरणात जे कोणी दोषी असतील त्या सर्वांवर कठोरात कठोर कारवाई झाली पाहिजे, अशी मागणी अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेकडून करण्यात येतेय.
पुणे विद्यापीठात मुलींच्या हॉस्टेलमध्ये धक्कादायक प्रकार घडला आहे. वसतिगृहातील एक रूमध्ये मोठ्या प्रमाणात दारुच्या बाटल्या अन् सिगारेटची पाकिटं सापडली आहेत. तक्रार करुनही याकडे साफ दुर्लक्ष केल्याचं सांगितलं जातंय. तर सिगारेटची पाकिटं आणि व्हिडिओ समोर आले आहेत.
या प्रकारामुळे पुण्यात नेमकं चाललंय काय? असा प्रश्न उपस्थित होत आहे. सोबतच आता सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ प्रशासनावर देखील प्रश्नचिन्ह उपस्थित होत आहे. वसतिगृह महिला अधिकाऱ्याने या प्रकाराकडे कानाडोळा का केला? असा सवाल देखील उपस्थित होत आहे. यामुळे विद्यापीठाचा दर्जा तर घसरत नाही ना, असा देखील सवाल उपस्थित केला जातोय. या प्रकारामुळे पालकांमध्ये देखील काळजीचं वातावरण आहे.