गुढीपाडव्याचा दिवशी राज ठाकरे करणार संबोधित , तर मेळाव्यास जाणाऱ्या येणाऱ्या मनसैनिकांना टोल आकारू नये मनसेच्या वतीने आरबीआयला पत्र.
प्रेस मीडिया लाईव्ह :
चंद्रशेखर पात्रे :
देहूरोड दि. :- महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या वतीने शिवाजी पार्क मुंबई येथे गुडी पाडवाच्या दिवशी सादाबाद प्रमाणे गुढी पाडवा मेळावा घेण्यात येणार आहे यामेळाव्याचा आढावा बैठक लोणावळा येथे २७ मार्च रोजी आयोजित करण्यात आले होते.
या आढावा बैठकीत पुणे मावळ सह अनेक पदाधिकारी कार्यकर्ते उपस्थित होते या गुढीपाडव्याचा मेळाव्याला महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे संस्थापक अध्यक्ष राज ठाकरे हे संबोधित करणार आहेत या मेळाव्याला राज्यातुन अनेक पदाधिकारी कार्यकर्ते उपस्थित होणार आहे याच पार्श्वभूमीवर पुणे मावळच्या वतीने आरबीआयच्या व्यवस्थापकांना मनसेच्या वतीने पत्र देण्यात आले आहे कि दिनांक ३०/३/२५ रोजी सालाबादप्रमाणे गुढीपाडवा मेळावा श्री शिवाजी पार्क मुंबई येथे घेण्यात येणार आहे या मेळाव्यास मा. राज ठाकरे हे संबोधित करणार आहे .
सदर मेळाव्यात संपूर्ण महाराष्ट्रातुन मनसैनिक मोठ्या संख्येने हजर राहणार आहेत तरी महाराष्ट्र धर्माची गुढी उभारायला पुणे जिल्ह्यातुन जाणाऱ्या व येणाऱ्या तमाम मनसैनिकांच्या वाहनांना जाताना व येताना आपले महामार्ग टोल मुक्त करावा असे पत्र महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे पुणे जिल्हा अध्यक्ष ॶॅड. रविंद्र बबनराव गारुडकर यांनी दिले आहे. या पत्रावर मावळ तालुका उपाध्यक्ष मोझेस दास देहूरोड शहर अध्यक्ष जाॅर्ज दास व भरत बोडके यांचे सही असलेले पत्र आरबीआयच्या व्यवस्थापकांना दिल्याचे मावळ तालुका उपाध्यक्ष मोझेस दास यांनी द प्रेस मीडीया लाईव्ह च्ये जिल्हा प्रतिनिधी चंद्रशेखर पात्रे यांना माहिती देताना दिली.