प्रेस मीडिया लाईव्ह :
पुणे : स्वारगेट अत्याचार प्रकरणात सोमवारी नराधम दत्तात्रय गाडेचा मामे भाऊ याने पत्रकार परिषद घेऊन पोलीस संरक्षण देण्याची मागणी केली. तर, दत्तात्रय याचे वकिल वाजीद खान यांनी पत्रकार परिषदेत त्यांच्यात आर्थिक व्यवहार झाला असे आम्ही म्हणलोच नाही, असेही स्पष्ट केले.तर, त्यांना त्यांच्यात ओळख होती, याबाबतही काही बोलता आले नाही. त्यामुळे याप्रकरणात मुद्दाम फेक नॅरेटिव्ह पसरविला जात असल्याचे प्रथमदर्शनी तरी दिसत आहे.
स्वारगेट बसस्थानकात २६ वर्षीय तरुणीवर झालेल्या अत्याचार प्रकरणात आरोपी दत्तात्रय गाडे याचे वकिल वाजिद खान व दत्ताच्या भावाने एकत्रित पत्रकार परिषद घेतली. यावेळी त्यांनी गाडे कुटूंबियांच्या वतीने पोलीस आयुक्त अमितेशकुमार यांना पोलीस संरक्षण देण्याच्या मागणीचे पत्र दिले आहे. आम्हाला संरक्षण हवे असल्याचे सांगितले. तसेच, गावातील लोकांचा आमच्याकडे बघण्याचा दृष्टीकोन बदलला आहे, असे त्याच्या भावाने सांगितले.
तर, आरोपी घरी आल्यानंतर काहीही बोलला नाही. त्याच नाव बदनाम आहे, त्यामुळे मी जास्त बोलत नसल्याचेही भाऊ म्हणाला. तपास योग्य झाला पाहिजे. जिच्यासोबत घटना घडली, तिला न्याय मिळाला पाहिजे. चौकशीत दोष सिद्ध झाल्यास फाशी दिली तरी चालेल. परंतु, घटना सत्य आहे का नाही, ह्याचाही तपास व्हावा, असे मत दत्तात्रय याचा भावाने व्यक्त केले आहे.