प्रेस मीडिया लाईव्ह :
उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेत एका पदासाठी दोन मर्सिडीज द्याव्या लागत होत्या, असं वक्तव्य नीलम गोऱ्हे यांनी केलं होतं, आता त्यांनी आपलं हे वक्तव्य मागे घेतल्याची माहिती सूत्रांकडून मिळत आहेनीलम गोऱ्हे यांच्या या वक्तव्यानंतर शिवसेना ठाकरे गट चांगलाच आक्रमक झाला होता, त्यांना पक्षाकडून नोटीस बजवण्यात आली होती, या नोटीसीनंतर त्यांनी दिलगिरी व्यक्त करत आपलं वक्तव्य मागे घेतल्याची माहिती सूत्रांकडून मिळत आहे. त्यानंतर आता शिवसेना ठाकरे गटाकडून देखील पुढची कारवाई थांबवण्यात आल्याची माहिती मिळत आहे.
नेमकं काय आहे प्रकरण..?
दिल्लीमध्ये अखिल भारतीय साहित्य संमेलनाचं आयोजन करण्यात आलं होतं, या संमेलनातील एका सत्रात बोलताना नीलम गोऱ्हे यांनी शिवसेना ठाकरे गटावर गंभीर आरोप केला होता. उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेत एका पदासाठी दोन मर्सिडीज द्यावा लगत होत्या, असा आरोप गोऱ्हे यांनी केला होता. यावरून राजकारण चांगलंच तापलं. शिवसेना ठाकरे गट प्रचंड आक्रमक झाला होता. खासदार संजय राऊत यांनी तर थेट अखिल भारतीय मराठी साहित्य महामंडळाच्या अध्यक्षा उषा तांबे यांना पत्र लिहून आपली नाराजी व्यक्त केली आहे.
त्यानंतर शिवसेना ठाकरे गटाकडून या वक्तव्याप्रकरणात निलम गोऱ्हे यांना नोटीस पाठवण्यात आली होती. या नोटीसीनंतर आता नीलम गोऱ्हे यांनी आपलं वक्तव्य मागे घेतल्याची माहिती समोर येत आहे, त्यांनी या प्रकरणात दिलगिरी देखील व्यक्त केल्याची माहिती सूत्रांकडून देण्यात आली आहे. त्यानंतर आता ठाकरे गटाकडून पुढची कारवाई थांबवण्यात आल्याची माहिती समोर येत आहे..