- संरक्षण मंत्री राजनाथसिंह यांनी लवकरच यावर तोडगा काढण्यासाठी सर्दन कंमाडच्या अधिकाऱ्यांना निर्देश दिले जातील असे आश्वासन खासदार श्रीरंग आप्पा बारणे यांना दिले.
प्रेस मीडिया लाईव्ह :
चंद्रशेखर पात्रे
पिंपरी दि :- देहूरोड कॅन्टोन्मेंट बोर्डाच्या हद्दीत अनेक वर्षा पासुन राहत असलेले नागरिक रस्त्यासाठी त्रस्त आहेत संरक्षण विभागाच्या हद्दीत असलेल्या झेंडे मळा, काळोखेळा, हगवणे मळा परिसरातील नागरिक रस्त्यांच्या समस्येने त्रस्त आहेत. या भागात रस्ते करण्यासाठी कॅन्टोन्मेंट बोर्डाने निविदा प्रसिध्द केली आहे. मात्र, संरक्षण विभागाची कामास हरकत आहे. त्यामुळे मावळचे शिवसेना खासदार श्रीरंग बारणे यांनी थेट सरंक्षण मंत्री राजनाथ सिंह यांची भेट घेऊन या रस्त्याबाबत साकडे घातले आहे. यावर संपूर्ण माहिती घेऊन सदन कमांडच्या अधिकाऱ्यांना निर्देश देण्याची ग्वाही सिंह यांनी दिली.
देहूरोड कॅन्टोन्मेंट बोर्डाने रस्त्या करण्याचा प्रस्ताव मंजूर केला आहे. निविदा काढली आहे. मात्र, हा रस्ता संरक्षण विभागाअंतर्ग येतो. संरक्षण कायद्यानुसार प्रतिबंधित आहे. पूर्वी सैन्य अधिकाऱ्यांनी रस्त्याचा प्रस्ताव फेटाळला आहे. परंतु, रस्ता ही मूलभूत गरज आहे. रस्त्याची गरज आहे. देहूरोड कॅन्टोन्मेंट बोर्डाने ३१ मार्च २०२३ रोजी प्रस्ताव मंजूर करून दक्षिणी कमांडला पाठविला होता. प्रस्तावित रस्त्याची लांबी १८८५ मीटर आणि रुंदी ३.५ मीटर आहे. हा रस्ता संरक्षण विभागाच्या सर्वे नंबर १६३, १६४, १६१ मधून जाणार आहे. त्यामुळे हा रस्ता निर्माण करण्यासाठी मान्यता द्यावी. देहूरोड कॅन्टोन्मेंट बोर्ड निधी आणि खासदार, आमदारांच्या निधीतून हा रस्ता पूर्ण करेल. त्यावर सरंक्षण मंत्री राजनाथ सिंह म्हणाले, याबाबतची संपूर्ण माहिती घेतो. त्यानुसार सदन कमांडच्या अधिकाऱ्यांना निर्देश दिले जातील. असे संरक्षण मंत्री राजनाथसिंह यांनी खासदार श्रीरंग आप्पा बारणे यांना दिले आहे त्यामुळे आता लवकरच येथील नागरिकांचे हे जटिल प्रश्न सुटणार आहे.