पिंपरी चिंचवड सायबर पोलीसांकडुन लोकांना आवाहन कुठल्याही गोष्टीला बळी पडु नका .
प्रेस मीडिया लाईव्ह :
चंद्रशेखर पात्रे :
पिंपरी दि :- पिंपरी चिंचवड सायबर गुन्हे शाखेला मोठे यश प्राप्त झाले आहे निवृत्त शासकीय कर्मचाऱ्यांची वेळ वेगळ्या पद्धतीने आमिष दाखवून दोन कोटी ३० लाख रुपये ची फसवणूक केल्याप्रकरणी पिंपरी चिंचवड सायबर क्राईम पोलीसांनी सायबर चोरट्यांना केले आहे इन्शुरन्स कंपनी मधून बोलत असल्याचं सांगून मोठी रक्कम मिळवून देण्याच्या बहाण्याने निवृत्त सरकारी कर्मचाऱ्याला २ कोटी ३० लाख रुपयांची फसवणूक केल्याचं उघडकीस आलं आहे. याप्रकरणी पिंपरी- चिंचवडच्या सायबर पोलिसांनी आरोपीला अटक केली आहे. लक्ष्मणकुमार पुनारामजी प्रजापतीला पुणे शहरातून तर भूपेंदर जीवनसिंग जिना आणि लक्ष्मण सिंग या दोघांना दिल्लीमधून अटक करण्यात आली.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपींनी निवृत्त सरकारी कर्मचाऱ्याला इन्शुरन्स कंपनी मधून बोलत असल्याचं भासवले. पॉलिसी काढून त्याचा जास्त परतावा (रक्कम) मिळेल अस अमिश दाखवलं. त्यासाठी तुम्हाला जीएसटी, इन्कम टॅक्स, टीडीएस, असे वेगवेगळे चार्जेस लागतील ती रक्कम परत मिळेल अस ही सांगितलं. त्यानंतर एनपीआय, आयआरडीए, दिल्ली फायनान्स मिनिस्ट्री मधून बोलत असून त्यांचे थकलेले पैसे काढून देतो अशी वेगवेगळी कारणे सांगून आणि विश्वास संपादन करून फिर्यादी यांना वेगवेगळ्या बँक खात्यात आणि रोख रक्कम अशी एकुण २ कोटी ३० लाख ८ हजारांची फसवणूक केली.फसवणूक झाल्याचे लक्षात येताच निवृत्त सरकारी कर्मचाऱ्याने तात्काळ पिंपरी- चिंचवड सायबर पोलिसांशी संपर्क साधत तक्रार दाखल केली. या प्रकरणाचा तपास पोलीस निरीक्षक रविकिरण नाळे यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस निरीक्षक प्रवीण स्वामी यांच्या टीमने केला आहे तपासादरम्यान २ कोटी पैकी १ कोटी ६१ लाख रुपये हे पुण्यातील लक्ष्मणकुमार प्रजापतीकडे दिल्याचे उघड झाले. त्याला सायबर पोलिसांनी ताब्यात घेऊन चौकशी केली असता प्रजापतिकडून दहा लाख रुपये आणि पैसे मोजण्याची एक मशीन जप्त करण्यात आली. इतर दोन जण दिल्लीत असल्याचे देखील उघड झाले. सायबर पोलिसांची दोन टीम दिल्लीकडे रवाना केल्या. दिल्लीतील पंधरा दिवसांच्या तपासानंतर फरिदाबाद येथून भूपेंदर जीवनसिंग जिना आणि लक्ष्मण सिंगला ताब्यात घेण्यात आले. या गुन्ह्यात त्यांचा सहभाग असल्याचं त्यांनी कबुल केले आहे. त्यांच्याकडे एन.सि.पी.आय अधिकाऱ्याचे बनावट आय कार्ड मिळाले आहे. दिल्लीतील दोघांनी भारतातील अनेक नागरिकांची फसवणूक केल्याचा संशय पोलिसांना आहे. या मागे मोठी टोळी असण्याची शक्यता देखील पोलिसांनी वर्तवली आहे.
सदरची कारवाई पोलीस निरीक्षक रविकिरण नाळे, सहायक पोलिस निरीक्षक प्रविण स्वामी, पोलीस उपनिरीक्षक सागर पोमण, वैभव पाटील, प्रकाश कातकाडे, पोलीस उपनिरीक्षक विद्या पाटील पोलीस अंमलदार दिपक भोसले, हेमंत खरात, नितेश बिच्चेवार, अतुल लोखंडे, सौरभ घाटे, श्रीकांत कबुले, विशाल निचीत, दिपाली चव्हाण, प्रिया वसावे, भाविका प्रधान सायबर पोलीस ठाणे यांच्या पथकाने केली आहे.
"पोलिसांकडून नागरिकांना आवाहन"..
आपल्याला वेगवेगळ्या मोबाईल नंबरवरुन फोन करुन ते इन्शुरन्स कंपनीमधुन बोलत असुन त्यांच्या मार्फतीने पॉलीसी काढल्यास नागरीकांना जास्तीत जास्त फायदा मिळवुन देण्याची अमिष दाखवुन त्यांच्या कडुन वेगवेगळ्या बँकेच्या अकाऊंटला व रोख स्वरुपात पैसे घेऊन फसवणुक करीत आहे. त्याकरीता नागरीकांनी योग्य कंपनी मार्फत पॉलीसी काढुन घ्यावी जणेकरुन आपली फसवणुक होणार नाही असे आवाहन पोलीसांच्या वतीने करण्यात आले आहे.