चांभार्ली ग्रामपंचायतच्या उपसरपंचपदी शेकापचे स्वप्निल जगन जांभळे, प्रीतम म्हात्रे यांनी दिल्या शुभेच्छा

 

प्रेस मीडिया लाईव्ह :

 विशेष प्रतिनिधी : सुनील पाटील

पनवेल : शेतकरी कामगार पक्षाचे चांभार्ली ग्रामपंचायत सदस्य स्वप्निल जगन जांभळे यांची चांभार्ली ग्रामपंचायतच्या उपसरपंचपदी बिनविरोध निवड झाली त्याबद्दल त्यांचे शेकाप नेते प्रितम जे एम म्हात्रे यांनी अभिनंदन केले.

    सामाजिक आणि राजकीय क्षेत्रात त्यांचा असलेला कामांचा अनुभव यापुढे ग्रामपंचायतीला नक्कीच उपयुक्त ठरेल आणि विकासाची कामे यापुढे चांभार्ली ग्रामपंचायत मधील मार्गी लागतील. त्यांच्या पुढील कारकीर्द साठी त्यांना शेकाप नेते प्रितम जे एम म्हात्रे यांनी शुभेच्छा दिल्या. यावेळी  शेकाप नेते प्रितम जे एम म्हात्रे यांच्यासोबत संतोष जंगम (मा. उपनगराध्यक्ष खालापूर), श्री. जगदीश पवार (पंचायत समिती सदस्य), श्री. दत्ता जांभळे (मा. सरपंच चांभार्ली), कु. रोहीत घरत (मा. उपसरपंच कसळखंड), श्री. सचिन मते (मा. उपसरपंच चौक), श्री. मिलिंद मुंढे, श्री. निखिल ढवळे, सरपंच, सदस्य, ग्रामसेवक व ग्रामस्थ उपस्थित होते.

Post a Comment

Previous Post Next Post