घराघरात जाऊन पोलिसांनी समाजकंटकांना पकडण्याचं काम सुरू केलं आहे.

 

प्रेस मीडिया लाईव्ह :

 औरंगजेबाची कबर हटवण्यासाठी नागपुरात काल सकाळी मोर्चा काढण्यात आला. त्यानंतर संध्याकाळी दोन गटांमध्ये धुमश्चक्री उडाली. नागपुरातील महाल परिसरात दोन्ही गट आमनेसामने आले आणि एकमेकांवर दगडफेक सुरू केली.त्यानंतर वाहनांची जाळपोळ सुरू करण्यात आली. हल्लेखोरांनी पोलिसांवरही दगडफेक केली. त्यात 8 ते 10 पोलीस जखमी झाले असून फायर ब्रिगेडचे चार जवानही जखमी झाले आहेत. या हल्ल्यामुळे नागपूरमध्ये तणाव निर्माण झाला असून पोलिसांनी कोम्बिंग ऑपरेशन सुरू केलं आहे. घराघरात जाऊन पोलिसांनी समाजकंटकांना पकडण्याचं काम सुरू केलं आहे.

काल संध्याकाळी महाल परिसरात अचानक दोन गट आमनेसामने आले. दोन्हीकडून जोरदार दगडफेक करण्यात आली. वाहनांची जाळपोळ करण्यात आली. त्यामुळे एकच खळबळ उडाली. पोलीस हल्लेखोरांना पांगवण्यासाठी आले असता पोलिस आणि अग्निशमन दलाच्या जवानांवरही दगडफेक करण्यात आली. त्यात 8 ते 10 पोलीस जखमी झाले आहेत. तर फायर ब्रिगेडचे चार जवान जखमी झाले आहेत. मात्र, पोलिसांनी जीवाची पर्वा न करता लाठीमार करत, अश्रूधुराच्या नळकांड्या फोडत जमावाला पांगवले. तब्बल दीड तास ही धुमश्चक्री सुरू होती. मात्र, आता परिस्थिती नियंत्रणात असल्याचं पोलिसांनी सांगितलं. तसेच आतापर्यंत 20 हून अधिक संशयितांना ताब्यात घेण्यात आल्याचं पोलिसांनी सांगितलं.

Post a Comment

Previous Post Next Post