पँथर आर्मीचे आझाद मैदानावरील बेमुदत उपोषण स्थगित

 भुमिहिनाचा प्रश्न लवकरच मार्गी लावण्याचे प्रधान सचिव डॉ हर्षदीप कांबळे यांचे आश्वासन

प्रेस मीडिया लाईव्ह :

मुंबई : विधिमंडळाच्या अर्थसंकल्पीय अधिवेशन प्रसंगी भूमिहिनांच्या  विविध प्रश्नांसाठी व मागासवर्गीय यांच्या अर्थसंकल्पातील हक्काच्या वाट्या करिता अनुसूचित जाती बौद्ध व मागासवर्गीयांच्या  होत असलेली आर्थिक , सामाजिक, शैक्षणिक व सांस्कृतिक नाकेबंदी उठवण्यासाठी पँथर आर्मी स्वराज्य क्रांती सेनेचे बेमुदत उपोषण हल्लाबोल आंदोलन दुसऱ्या दिवशी स्थितीत केल्याची घोषणा संस्थापक अध्यक्ष संतोष आठवले यांनी केले

  सामाजिक न्याय विभागाचे प्रधान सचिव डॉक्टर हर्षदीप कांबळे व आंदोलक यांच्यात आंदोलनाच्या प्रमुख मागण्यांच्या संदर्भात सविस्तर चर्चा करण्यात आली .यावेळी .डॉ . हर्षदीप कांबळे यांनी कर्मवीर दादासाहेब गायकवाड सबलीकरण स्वाभिमान योजनेतील इम्प्लिमेंटेशन करण्याचे कार्य सुरू असून लवकरच भूमीहिनांचा  प्रश्न मार्गी लावू त्याचबरोबर अनुसूचित जाती समाजातील विद्यार्थ्यांना व्यवसायिक अभ्यासक्रमासाठी जात वैधता प्रमाणपत्राची सक्ती लावण्यात येणार नाही असेही आश्वासन देण्यात आले यावेळी पँथर आर्मी स्वराज्य क्रांती सेनेचे संस्थापक अध्यक्ष संतोष आठवले व महाराष्ट्र प्रदेश प्रमुख महेंद्र वाघमारे व राष्ट्रीय संघटक अमोल कुरणे उपस्थित होते .

या बेमुदत उपोषण हल्लाबोल आंदोलनात राष्ट्रीय नेते डॉ . राजेंद्रसिंग वालिया , महाराष्ट्र प्रदेश प्रभारी उमेश जामसंडेकर , राष्ट्रीय संघटक अमोल कुरणे  महाराष्ट्र प्रदेश प्रमुख महेंद्र वाघमारे ,  महाराष्ट्र प्रदेश उप प्रमुख प्रा . अरुण मेढे 'महाराष्ट्र प्रदेश महिला आघाडी प्रमुख ज्योतीताई झरेकर, महाराष्ट्र प्रदेश मुख्य संघटक लक्ष्मीकांत कुबळे , पालघर जिल्हा प्रमुख आशा मोरे , पुणे शहर प्रमुख  जावेद शेख , पुणे शहर संघटक  सिताबाई शिरसागर  आंबेडकरी चळवळी चे ज्येष्ट विचारवंत दादासाहेब यादव , प्रा . अरुण मेढे  ,राजेश घोलप 'हरिष चव्हाण ,अनिल घोडके , पोर्णिमा बनसोडे , आदीच्या सह बहुसंख्येने कार्यकर्ते उपस्थित होते .

Post a Comment

Previous Post Next Post