प्रेस मीडिया लाईव्ह :
मुरलीधर कांबळे :
कोपार्डे - करवीर तालुक्यातील कोपार्डे येथे असलेल्या ग्रामपंचायतीच्या पाण्याच्या टाकी वरुन उडी मारल्याने रघुनाथ नारायण शिंदे (वय 52) यांचा मृत्यु झाला.हा प्रकार शुक्रवार (दि.07 मार्च) रोजी सकाळी दहाच्या सुमारास घडला.या घटनेची नोंद सीपीआर पोलिस चौकीत झाली आहे.
कोपार्डे येथील रघुनाथ शिंदे हे गावातील घरात रहात होते.तसेच त्यांचे जनावरांच्यासाठी पाण्याच्या टाकी जवळ शेड वजा घर असून आज सकाळी दहाच्या सुमारास फिरत जाऊन तेथे ग्रामपंचायतीची पाण्याची टाकीवरुन उडी मारल्याने ते गंभीर जखमी झाल्याने त्यांना उपचारासाठी सांगरुळ फाटा येथे खाजगी रुग्णालयात दाखल केले होते.तेथे उपचार घेऊन पुढ़ील उपचारासाठी सीपीआर रुग्णालयात दाखल केले असता त्यांचा उपचारापूर्वी मृत्यु झाला.ग्रामपंचायतीची पाण्याची टाकी लांब टेकडीवर असल्याने त्या परिसरात सहसा कोण जात नाही.त्यामुळे रघुनाथ शिंदे यांनी हा प्रकार केल्याची शक्यता असल्याची माहिती त्यांच्या नातेवाईकांनी दिली.
त्यांच्या पश्च्यात पत्नी आणि दोन मुले आणि एक बहिण आहे.