प्रेस मीडिया लाईव्ह :
मुरलीधर कांबळे :
कोल्हापूर- करवीर तालुक्यातील आरे येथील शेतकरी भगवान धोंडिराम वरुटे (52) यांचा भोगावती नदी पात्रात तोल जाऊन पडल्याने मृत्यु झाला.हा प्रकार शनिवार (दि.29) रोजी पहाटे पाचच्या सुमारास घडला. घटनेची नोंद सीपीआर पोलिस चौकीत झाली आहे.
भगवान वरुटे हे शनिवार (दि.29) रोजी पहाटे पाचच्या सुमारास संगम नावाच्या शेतात शेताला पाणी पाजण्यासाठी गेले होते. त्यांच्या शेतातील असलेली पाण्याची मोटर चालू करीत असताना तोल जाऊन नदी पात्रात पडले.सकाळी गेलेले भगवान वरुटे हे अजून घरी का परत आले नाहीत म्हणून त्यांच्या नातेवाईकांनी शोध घेतला असता ते नदी पात्रात तरंगताना आढ़ळल्याने त्यांना पाण्याबाहेर काढ़ुन सीपीआर रुग्णालयात दाखल करण्यात आले असता त्यांचा उपचारापूर्वी मृत्यु झाला.
त्यांच्या पश्च्यात पत्नी ,तीन मुली आणि एक भाऊ आहे.