प्रेस मीडिया लाईव्ह :
मुरलीधर कांबळे :
कोल्हापूर- सांगली फाटा येथे गांजा अंमली पदार्थांची विक्री करण्यासाठी आलेल्या सत्यजीत सदाशिव जाधव (वय 34.जाधव बोअरवेल्स जवळ,विकासनगर ,इंचलकरंजी.सध्या रा.रत्नागिरी) याला स्थानिक गुन्हे अन्वेषण पथकाने त्याला ताब्यात घेऊन त्याच्या कडील 9 किलो 78 gm.वजनाचा गांजा अंमली पदार्थ व इतर साहित्य असा एकूण 2 लाख 38 हजार 450/ रुपये किमंतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.
वरिष्ठ पोलिस अधिकारी यांनी अवैद्य व्यवसाय अंमली पदार्थांचा साठा व विक्री करीत असलेल्यांचा शोध घेऊन त्यांच्यावर कारवाई करण्याच्या सूचना दिल्या होत्या.वरिष्ठांच्या आदेशा प्रमाणे स्थानिक गुन्हे अन्वेषणचे पोलिस निरीक्षक रविंद्र कळमकर यांनी स्थानिक गुन्हे अन्वेषण कडील पोलिसांची तपास पथके तयार करून अवैद्य गांजाची विक्री व वहातुक करण्यारयाची माहिती घेत असताना या पथकातील पोलिस सागर चौगुले यांना माहिती मिळाली की,सांगली फाटा येथे एक जण गांजाची विक्री करण्यासाठी येणार असल्याची माहिती मिळाली.मिळालेल्या माहितीनुसार सहा.पोलिस निरीक्षक चेतन मसुटगे,पोलिस उपनिरीक्षक जालिंदर जाधव हे पोलिस पथकासह सदर ठिकाणी सापळा रचून दि.22 मार्च रोजी छापा टाकून कारवाई केली.त्याच्याकडे चौकशी केली असता त्याने रत्नागिरी येथे विक्री साठी घेऊन जात असल्याची कबुली पोलिसांना दिली.पोलिसांनी त्याच्या विरोधात शिरोली एमआयडीसी पोलिस ठाण्यात एनडीपीएस कायद्यानुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे.पुढ़ील तपास शिरोली एमआयडीसी पोलिस करीत आहेत.