प्रेस मीडिया लाईव्ह :
मुरलीधर कांबळे :
कोल्हापूर- चंदगड येथे बिबट्याची गोळ्या घालून शिकार केल्या प्रकरणी बयाजी रामू वरक (,वय 45.रा.बुझवडे ,चंदगड ) याला पोलिसांनी अटक केली आहे.
बिबट्याची शिकार करून त्याचे कातडे विकण्यासाठी कोल्हापूर येथील तपोवन मैदान येथे आलेल्या बाबू सखाराम डोईफोडे आणि धाकलू बाळू शिंदे यांना स्थानिक गुन्हे अन्वेषण पथकाने दि.13 फ़ेब्रु.रोजी अटक केली होती. त्या दोघांच्यावर वन्यजीव संरक्षण कायद्यानुसार जुना राजवाडा पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता. पोलिसांनी त्या दोघांच्याकडे अधिक चौकशी केली असता त्यांनी बुझवडे येथील बयाजी रामू वरक यांने दिड दोन वर्षांपूर्वी बिबट्याची शिकार केल्याची माहिती दिली.दिलेल्या माहितीनुसार पोलिसांनी बयाजी वरक याचा शोध घेऊन अटक केली.