मयताच्या खोट्या सह्या करून फसवणुकीचा प्रयत्न.

 

प्रेस मीडिया लाईव्ह :

मुरलीधर कांबळे :

कोल्हापूर- मयत बापूसाहेब आदगोंडा पाटील यांच्या खोट्या सह्या करून तसेच त्यांच्या नावावर असलेली वीज अनामत रकमेचा अपहार करून  शासकीय यंत्रणेकडे खोट्या माहितीच्या आधारे शपथपत्र सादर करून खोटी कागदपत्रे तयार करून महानगरपालिकेच्या असेसमेंट उताऱ्यावर आपले नाव चढवण्याचा प्रकार उघडकीस आला.या प्रकरणी प्रताप बाळासाहेब जाधव आणि  प्रशांत बाळासाहेब जाधव (दोघे रा. लक्ष्मीपुरी, कोल्हापूर) यांच्यावर शाहूपुरी पोलीस ठाण्यात ४ मार्च रोजी गुन्हा दाखल झाला आहे.याची फिर्याद  उदयकुमार मिताक्षर पाटील (वय ४८, रा. व्यापारी पेठ, शाहूपुरी) यांनी शाहुपुरी पोलिस ठाण्यात  दिली आहे.

दि. ४ एप्रिल, २०२२ रोजी हा गुन्हा शाहूपुरी व्यापार पेठ येथे तसेच महावितरण ग्राहक सेवा केंद्र, ताराबाई पार्क कोल्हापूर येथे घडला होता. त्याच प्रमाणे त्याची विज मंडळाकडे असलेली अनामत रक्कम ९६० रुपयांचा अपहार संशयितांनी केला असल्याचे फिर्यादी यांनी म्हटले आहे. शाहुपुरी पोलिस ठाण्याचे पोलिस निरीक्षक  संतोष डोके यांच्या मार्गदर्शनाखाली उपनिरीक्षक गुणवरे हे पुढ़ील तपास करत आहेत.

--- ----------

 सोनतळी येथे घरफोडी तीन लाख रुपये किमंतीचा मुद्देमाल लंपास .

कोल्हापूर -करवीर तालुक्यातील  सोनतळी येथील अभिषेक गावडे यांच्या बंद घराचे कुलूप उचकटून चोरट्याने बेडरूममधील कपाटातील चार तोळे सोन्याचे दागिने, रोख रक्कम १४ हजार व चांदीचे दागिने असा तीन लाख रुपयांचा मुद्देमाल लंपास केला. या प्रकरणी गावडे यांनी करवीर पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.

गावडे हे आपल्या कुटुंबीयांसह २ मार्च रोजी गोवा येथे धार्मिक कार्यासाठी गेले होते. ३ रोजी ते कोल्हापुरात परत आले होते . या दरम्यान त्यांच्या घराचे कुलूप उचकटून चोरट्याने घरात प्रवेश करून तिजोरी उचकटून तीन तोळ्यांची माळ, चार ग्रॅमचे टॉप्स, पाच ग्रॅमची अंगठी, लहान बाळाच्या सात अंगठ्या, चांदीचे दागिने असे दागिने चोरीला नेल्याची घटना घडली आहे. घरी आल्यानंतर त्यांना हा प्रकार समजला. त्यांनी करवीर पोलिसांत तक्रार दिली आहे. आर.के.नगरमध्येही सेवानिवृत्त प्राधापकाच्या घरात अशाच प्रकारची चोरी झाली. दोन्ही चोऱ्या एकाच टोळीने केल्या असाव्यात, असा अंदाज पोलिसांनी वर्तवला आहे.

Post a Comment

Previous Post Next Post