प्रेस मीडिया लाईव्ह :
मुरलीधर कांबळे :
कोल्हापूर- शिंगणापूर परिसरातील सदाशिव - शांता पार्क, शाकंभरी, कोर्ट कॉलनी येथील बेकायदेशीर केलेल्या नळजोडणी धारकांवर दंड व फौजदारी गुन्हे नोंदवा अशा मागणीचे निवेदन २६ फेब्रुवारी रोजी कोल्हापूर जिल्हा व शहर नागरी कृती समितीने महानगरपालिका आयुक्त यांना दिले होते. त्यानुसार आज बुधवार (ता.१९) रोजी कोल्हापूर महापालिकेच्या पाणी पुरवठा विभागाच्या वसुली पथकाने कारवाई करत १६ जणांवर दंड व फौजदारी नोटीस बजावल्या.
शिंगणापूर परिसरातील कोर्ट कॉलनी, सदाशिव-शांता पार्क, शाकंभरी, मोरया कॉलनी, गणेश नगर, नवीन नागदेव मधील दत्तनगर येथे अनेक अनधिकृत नळजोडणी धारक असल्याने कोल्हापूर महानगरपालिकेचे लाखों रुपयांचे नुकसान होत असल्याच्या तक्रार या भागांतील कायदेशीर कनेक्शन धारकांकडून केल्या जात होत्या. यापूर्वी हि महानगरपालिकेच्या पाणीपुरवठा विभागाकडून येथील ४० च्या वर बेकायदेशीर पाणी कनेक्शन तोडण्यात आले होते. पण या लोकांनी कारवाई च्या दुसऱ्या दिवशी पुन्हा नळ कनेक्शन जोडून घेतल्याने यांच्यावर या भागातील लोक प्रतिनिधी व आमदारांचा वरदहस्त असल्याचा गंभीर आरोप कोल्हापूर जिल्हा व शहर नागरी कृती समितीने आयुक्तांसमोर केला होता.
संबंधित परिस्थितीची दखल घेवून आज बुधवारी (ता.१९) पालिका प्रशासनाच्या वतीने शिंगणापूर व बालिंगा हद्दीतील कोर्ट कॉलनी, सदाशिव-शांता पार्क, शाकंभरी कॉलनी येथील १६ अनधिकृत नळजोडणीधारकांना प्रत्येकी २५००० रूपये व पाण्याची चोरी केल्याबद्दल फौजदारी गुन्हा दाखल करण्यात येत असल्याच्या नोटीसा बजावण्यात आल्या. त्यामुळे शिंगणापूर परिसरातील पाणी चोरांवर चांगलीच जरब बसली आहे. अतिरिक्त आयुक्त राहुल रोकडे, जलअभियंता हर्षजीत घाटगे, पाणीपुरवठा अधीक्षक प्रशांत पंडत, वसुली पथक प्रमुख संजय पाटील यांच्या वतीने ही कारवाई करण्यात आली.
वैशाली कलकूटकी,
रणजित आयरेकर
फिरोज मुल्ला, रेश्मा गाडेकर, एकनाथ पाटील,वसुंधरा भोपळे,
निवास शिंदे, मालती टोपे,
सतिश चव्हाण, अशोक डिगे,
ज्योती पाटोळे अशी दंड आणि फौजदारी गुन्हा दाखल झालेल्याची नावे आहेत.
यांना प्रत्येकी पंचवीस हजार व फौजदारी गुन्हा नोंद करण्यात आल्याच्या नोटीस पालिकेच्या वतीने देण्यात आल्या.