प्रेस मीडिया लाईव्ह :
मुरलीधर कांबळे :
कोल्हापूर- अंबप फाटा येथे रस्त्यावरील खडी वरुन मोटारसायकल स्लिप होऊन झालेल्या अपघातात गौरी तेजस गायकवाड (वय 26.रा.विठ्ठल मंदीर जवळ मु.पो.वाठार किरोली,ता.कोरेगांव जि.सातारा) यांचा मृत्यु झाला.हा अपघात शनिवार (दि.08 मार्च) रोजी सकाळी आठच्या सुमारास घडला.या घटनेची नोंद सीपीआर पोलिस चौकीत झाली आहे.
वाठार किरोली येथील तेजस गायकवाड हे मिलीट्री जवान असून ते आज सकाळी आपल्या मोपेड गाडी वरुन पत्नी आणि लहान मुला समवेत देवदर्शनासाठी कोल्हापुरच्या दिशेने येत होते.कोल्हापूर -पूणे रोडवरील अंबप फाटा येथे आले असता रस्त्यावरील खडी वरुन मोपेड गाडी स्लिप झाल्याने पाठीमागे बसलेल्या त्यांची पत्नी गौरी या उडून खाली पडल्याने जखमी झाल्या होत्या.त्यांना उपचारासाठी 108 या रुग्णवाहिकेतुन बेशुध्दावस्थेत सीपीआर रुग्णालयात दाखल करण्यात आले असता त्यांचा उपचारापूर्वी मृत्यु झाला.यात त्यांचे पती आणि मुलगा जखमी असून त्यांच्यावर रुग्णालयात उपचार चालू आहेत.