मॉल मध्ये जाऊन खरेदी करण्याच्या बहाणा करून चोरी करणाऱ्या बंटी बबली पती पत्नीला अटक.

 

प्रेस मीडिया लाईव्ह :

मुरलीधर कांबळे :

कोल्हापूर - साने गुरुजी येथील स्टार लोकल मॉल मध्ये जाऊन चोरी करणाऱ्या परवेझ दिलावर शिलेदार व करिश्मा परवेझ शिलेदार (दोघे.रा.रेसिडेन्सी कॉलनी शास्त्रीनगर ,कोल्हापूर ) या बंटी बबली पती ,पत्नीवर जुना राजवाडा पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करून त्यांना अटक करण्यात आली आहे.हा प्रकार दि.22/02/2025 रोजी सायंकाळी साडेसहाच्या सुमारास घडला होता. याची फिर्याद या मॉलचे व्यवस्थापक केतन बाबूराव पाटील (वय 28) यांनी जुना राजवाडा पोलिस ठाण्यात दिली.

यातील फिर्यादी हे मॉल मध्ये व्यवस्थापक आहेत.दि.22 फ़ेब्रु.रोजी ते ड्युटीवर असताना सायंकाळी  साडे सहाच्या सुमारास साने गुरुजी येथे असलेल्या स्टार लोकल मध्ये एक जोडपे  खरेदी करण्यासाठी  आले होते.बराच वेळ झाला तरी खरेदी   करून परत न आल्याने व्यवस्थापक यांना संशय आल्याने याची माहिती तेथील सीसीटिव्ही कंट्रोल रुमच्या ऑपरेटर ऋषिकेश कांबळे याला खरेदी करण्यासाठी आलेल्या जोडप्यावर  नजर ठेवण्यास सांगितले.त्या वेळी ऋषिकेश कांबळे यांने खरेदी करण्यासाठी आलेल्या महिलेने आपल्या ड्रेसच्या साईट कप्प्याच्या  बँगेत काही माल लपवत असल्याचे सीसीटिव्हीत दिसत असल्याचे सांगितले.तो पर्यत आलेले जोडपे निघून गेले होते.त्या नंतर मालाची मोजदाद केली असता आलेल्या जोडप्यांनी दुकानातुन ऑईल ,ड्रायफ्रुट,सौदर्य प्रसाधने वगैरे असा एकूण 20 हजार रुपये किमंतीचा मुद्देमाल चोरीस गेल्याचे दिसून आले.सदर सीसीटिव्ही द्वारे तपास करीत असताना ते चार चाकीतुन  आल्याचे आढ़ळून आले.त्या चारचाकीच्या क्रमांकावरुन त्या पती,पत्नीचा शोध घेऊन पोलिसांनी त्यांच्याकडुन चोरीला गेलेला माल जप्त करून त्यांच्यावर जुना राजवाडा पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करून त्यांना अटक केली आहे.

ही कारवाई जुना राजवाडा पोलिस ठाण्याचे पोलिस निरीक्षक संजीव झाडे ,गुन्हे शोध पथकाचे पोलिस उपनिरीक्षक संतोष गळवे ,पोलिस हवालदार  प्रशांत घोलप ,सागर डोंगरे,सतिश  बांबरे,शिवाजी पाटील,अमर पाटील,प्रशांत पांडव,पोलिस नाईक संदिप माने,पोहेकॉ.वैभव खोत,मोहन लगारे,निलेश नाझरे ,महिला पोलिस कॉ.सारीका खोत,शितल कुंभार आणि सुप्रिया कात्रट यांनी केली.

Post a Comment

Previous Post Next Post