प्रेस मीडिया लाईव्ह :
मुरलीधर कांबळे :
कोल्हापूर- इतिहास संशोधक डॉ.इंद्रजित सावंत यांना धमकी देऊन छत्रपती शिवाजी महाराज आणि छत्रपती संभाजी महाराज यांच्या बद्दल अपशब्द वापरून फरार झालेला प्रशांत कोरटकर याला जुना राजवाडा पोलिसांनी तेलंगणा येथे सोमवारी ताब्यात घेऊन अटक करून मंगळवारी न्यायालयात हजर केले असता त्याला न्यायालयाने 28 मार्च पर्यत पोलिस कोठडी सुनावली होती.आज त्याची मुदत संपल्याने न्यायालयात हजर केले असता न्यायालयाने आणखी दोन दिवसांची पोलिस कोठडी सुनावली आहे.
जुना राजवाडा पोलिसांनी प्रशांत कोरटकर विरोधात जनतेत संताप असल्याने सुरक्षेच्या दृष्टीकोनातून सकाळी आठ वाजता न्यायालयात घेऊन आले होते.दुपारी एकच्या सुमारास चौथे सहदिवाणी न्यायाधीश एस.एस.तटसो यांच्या समोर सुनावणीस सुरुवात झाली.तपास अधिकारी जुना राजवाडा पोलिस ठाण्याचे पोलिस उपनिरीक्षक संतोष गळवे यांनी तीन दिवसांतील प्रशांत कोरटकरचा पोलिस कोठडीतील तपासाची माहिती दिली.कोरटकर याला फरार झाल्या पासून वास्तव्यास कुठे होता.त्याला या काळात आर्थिक मदत कुणी केली याची माहिती घ्यायची असल्याने आणखी पाच दिवसांची पोलीस कोठडी वाढ़वून मिळावी अशी विनंती न्यायालयाला केली.
सरकारी वकील यांनी प्रशांत कोरटकरवर गुन्हा दाखल झालेल्या काळात फरार होण्यासाठी धिरज चौधरी,प्रशिक पहवेकर ,राजेंद्र जोशी,राजू पेटकर ,डिफरत अली यांनी मदत केली आहे.यातील धीरज चौधरी हा मटका चालक असून त्याच्या मोटारीतुन गेल्याचा दावा Ad.सुर्यकांत पोवार यांनी न्यायालयात केला पोलिसांनी या पाच जणांना नोटीस बजावली असून त्यांची कोरटकर समोरासमोर चौकशी करायची असल्याने प्रशांत कोरटकरला आणखी पाच दिवसांची पोलिस कोठडीची मागणी केली.तर इंद्रजित सावंत याचे वकील Ad.असिम सरोदे हा खोटे बोलत असून तो फरार होण्याची शक्यता असल्याचे न्यायालयात सांगितले.बचाव पक्षाचे वकील Ad.सौरभ घाग यांनी तीन दिवसांत पोलिसांना तपासात सहकार्य केले असून पोलिस कोठडीची गरज नसल्याचे सांगितले.यावरुन Ad.असिम सरोदे आणि Ad.सौरभ घाग यांच्यात चांगलीच खडाजंगी झाली.यावर आक्षेप घेत सौरभ घाग यांनी न्यायालयात Ad.असिम सरोदे हे तपासातील पोलिस आहेत का वकील अशी विचारणा करण्यात आली.शेवटी वकीलांच्या युक्तीवादानंतर चौथे सहदिवाणी न्यायाधीश कनिष्ट स्तर एस.एस.तट यांनी 30 मार्च पर्यत पोलिस कोठडी सुनावली आहे.
न्यायालयातील सुनावणी झाल्यानंतर न्यायालयाच्या आवारात असलेल्या टी स्टॉल जवळ दुपारी दोनच्या सुमारास वकील Ad.अमितकुमार नानासाहेब भोसले (वय 45.रा.रुकडी) यांने प्रशांत कोरटकर याच्यावर हल्ला करण्याचा प्रयत्न केला.मात्र तेथे बंदोबस्तासाठी उपस्थित असलेल्या पोलिसांनी ताब्यात घेतले.
या वेळी पोलिस बंदोबस्त न्यायालयाच्या आवारात मोठ्या प्रमाणात ठेवण्यात आला होता.