स्थानिक गुन्हे अन्वेषण पथकाने "स्टिल चोरीच्या टोळीला अटक" करून साडे अकरा लाख रुपये किमंतीचा मुद्देमाल जप्त.

 


प्रेस मीडिया लाईव्ह :

मुरलीधर कांबळे :

कोल्हापूर -बांधकामासाठी लागणारी लोखंडी सळी चोरी केल्या प्रकरणी आकाश संजय कापसे (वय 35.रा.शुक्रवार पेठ,कोल्हापूर) आणि विश्वास विलास पाटील (,वय 43.रा.सम्राटनगर ,नलवडे कॉलनी,राजारामपुरी को.) या दोघांना स्थानिक गुन्हे अन्वेषण पथकाने अटक करून त्यांच्या कडील 11 लाख 60 हजार रुपये किमंतीचा मुद्देमाल जप्त केला आहे.

वरिष्ठ पोलिस अधिकारी यांनी कोल्हापूर जिल्हयात सर्व प्रकारच्या चोरीचे गुन्हे उघडकीस आणण्याच्या सूचना स्थानिक गुन्हे अन्वेषणचे पोलिस निरीक्षक रविंद्र कळमकर यांना दिल्या होत्या.

वरिष्ठांच्या सुचने प्रमाणे पोलिस निरीक्षक रविंद्र कळमकर यांनी वेगवेगळी पथके तयार करून चोरीचे गुन्हे उघडकीस आणण्याचा तपास करीत असताना पोलिस वैभव पाटील यांना माहिती मिळाली की ,कागल एमआयडीसी परिसरातील आर्या स्टिल येथून ट्रक चालक विश्वास पाटील आणि त्याचा मालक आकाश कापसे यांनी बांधकामासाठी लागणारी लोखंडी सळीची चोरी केली असून चोरलेली सळी एका ट्रक मध्ये ठेवून तो ट्रक सम्राटनगर येथे असल्याची माहिती मिळाली.

मिळालेल्या माहितीनुसार स्थानिक गुन्हे अन्वेषण पथकाने सम्राटनगर येथे जाऊन आकाश कापसे आणि विश्वास पाटील यांना ताब्यात घेऊन चौकशी केली असता सदरची सळी फाईव्ह स्टार एमआयडीसी कागल येथील आर्या स्टिल कंपनीतून चोरी केल्याची माहिती दिली.सदर बाबत गोकुळशिरगांव पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल असल्याची माहिती मिळाली.या दोघांनी चोरी केलेली लोखंडी सळी आणि गुन्हयांत वापरलेला ट्रक असा एकूण 11 लाख 60 हजार रुपये किमंतीचा मुद्देमाल जप्त करून या दोघांना पुढ़ील तपासासाठी गोकुळ शिरगांव पोलिसांच्या ताब्यात देण्यात आले.

ही कारवाई पोलिस अधीक्षक मा.महेंद्र पंडीत यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे अन्वेषणचे पोलिस निरीक्षक रविंद्र कळमकर, सहा.पोलिस निरीक्षक चेतन मसुटगे ,पोलिस उपनिरीक्षक जालिंदर जाधव,पोलिस वैभव पाटील,योगेश गोसावी,गजानन गुरव ,परशुराम गुजरे ,प्रविण पाटील,महेंद्र कोरवी,अरविंद पाटील,शिवानंद मठपती,विशाल खराडे,संजय हुंबे,प्रविण पाटील आणि कृष्णात पिंगळे यांनी केली.

Post a Comment

Previous Post Next Post