स्थानिक गुन्हे अन्वेषण आणि जुना राजवाडा पोलिसांची कौतुकास्पद कारवाई.
प्रेस मीडिया लाईव्ह :
मुरलीधर कांबळे :
कोल्हापूर- इतिहास संशोधक डॉ.इंद्रजित सावंत यांना धमकी देऊन छत्रपती शिवाजी महाराज आणि छत्रपती संभाजी महाराज यांचा अवमान करुन फरार झालेला प्रशांत कोरटकर याला स्थानिक गुन्हे अन्वेषणचे पोलिस निरीक्षक रविंद्र कळमकर आणि जुना राजवाडा पोलिस ठाण्याचे पोलिस निरीक्षक संजीव झाडे यांच्यासह त्यांच्या तपास पथकाला कोरटकरच्या मुसक्या आवळण्यात यश आले आहे.हे पोलिस पथक प्रशांत कोरटकरला ताब्यात घेऊन कोल्हापूरच्या दिशेने येत आहेत.
उद्या मंगळवार (दि.25 मार्च) रोजी न्यायालयात हजर करण्यात येणार आहे.
प्रशांत कोरटकर हा गुन्हा घडल्या पासून पोलिसांना चकवत होता.आज पोलिसांना तेलंगणा येथे मिळाला.
25 फ़ेब्रु.2025 रोजी रात्रीच्या सुमारास प्रशांत कोरटकर यांने इंद्रजित सावंत मोबाईलवर फोन करून धमकी देऊन राष्ट्र पुरुषांचा अवमान केला होता.दोन समाजात तेढ़ निर्माण होईल असे भाष्य केल्याने सावंत यांनी जुना राजवाडा पोलिस ठाण्यात तक्रार दाखल केली होती.त्या नंतर कोरटकरने जिल्हा व सत्र न्यायालयात अटकपूर्व जामिनासाठी अर्ज केला होता.न्यायालयाने 11 मार्च पर्यत अंतरिम जामीन मंजूर केला होता.या बाबत जिल्हा व सत्र न्यायाधिश डी.व्हि.कश्यप यांच्या न्यायालयात दोन वेळा सुनावणी झाली होती.सरकारी वकील Ad.विवेक शुल्क यांनी सरकारची बाजू मांडली होती.इंद्रजित सावंत यांच्या वतीने वकील Ad.असिम सरोदे यांनी बाजू मांडली.तर बचाव पक्षातर्फे वकील Ad.सौरभ घाग यांनी बाजू मांडली.सरकारी वकील यांनी केलेला जोरदार युक्तीवाद न्यायालयाने ग्राह्य धरुन प्रशांत कोरटकरचा अटकपूर्व जामीन फेटाळला.त्यामुळे जुना राजवाडा पोलिस आणि स्थानिक गुन्हे अन्वेषणचे तपास पथक प्रशांत कोरटकरच्या मागावर होते.तो रहात असलेल्या ठिकाणी पोलिस त्याचा शोध घेत होते.अखेर तेलंगणा येथे प्रशांत कोरटकर पोलिसांच्या हाती लागला.
दरम्यान प्रशांत कोरटकर यांने उच्च न्यायालयात जामीन अर्ज केला होता.त्या अर्जावर आज सुनावणी होणार होती.त्या पूर्वीच कोरटकरला पोलिसांनी अटक केली.
ही कारवाई स्थानिक गुन्हे अन्वेषणचे पोलिस निरीक्षक रविंद्र कळमकर ,जुना राजवाडा पोलिस ठाण्याचे पोलिस निरीक्षक संजीव झाडे,पोलिस उपनिरीक्षक शेष मोरे यांच्यासह त्यांच्या पथकाने केली.