बालिंगे येथे रस्त्याने चालत जात असलेल्या महिलेला मिक्सर डंपर चालकाने दिलेल्या धडकेत महिला ठार.

 




प्रेस मीडिया लाईव्ह  :

मुरलीधर कांबळे  :         

कोल्हापूर - करवीर तालुक्यातील  बालिंगा येथे आज दुपारी १२ च्या सुमारास मिक्सर डंपर चालकाच्या बेदकार ड्रायव्हिंग  करुन रस्त्याने चालत जात असलेल्या  श्रीमती मुगाबाई शंकर निगडे (वय ७५, रा. नागदेववाडी, ता. करवीर) या वृध्द महिलेस पाठीमागून धडक दिल्याने त्या जागीच ठार झाल्या. पोलिसांनी मिक्सर डंपर चालक सचिन माने (वय ३७, रा. कोतोली, ता. पन्हाळा) याला ताब्यात घेतले असून त्याच्यावर करवीर पोलिस ठाण्यात गुन्हा नोंद करण्यात आला आहे.

 मिळालेली माहिती अशी, सध्या कोल्हापूर - गगनबावडा १६६ जी राष्ट्रीय महामार्गाचे रस्ता रुंदी करण्याचे काम वेगात चालू आहे. त्यामुळे वहातुकीची कोंडी होत आहे.त्या परिसरात वहातुकीचे कोणत्याही प्रकारचे नियोजन नसल्याने वाहनधारकांना तारेवरची कसरत करावी लागत आहे.त्यातच आज   बालिंगा येथे नागदेववाडी येथील श्रीमती मुगाबाई शंकर निगडे या पेन्शन काढण्यासाठी कोल्हापूर जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या शाखेत पेन्शन काढण्यासाठी जात असताना मागून आलेल्या मिक्सर डंपर  गाडी नं. (MH09 : FL0444RMC )या मिक्सर डंपर चालकाने रस्त्याच्या     आजू बाजूला न पहाता  निष्काळजीपणे वाहन चालवून श्रीमती मुगाबाई निगडे या रस्त्याच्या कडेने जात असताना त्यांना पाठी मागून धडक दिली. या धडकेत त्यांच्या अंगावरून मिक्सरची चाके गेल्याने त्या जागीच ठार झाल्या.या अपघाताची नोंद गुन्हा करवीर पोलीस ठाण्यात झाली असून पोलिसांनी डंपर चालकावर गुन्हा नोंद केला असून अधिक तपास करवीर पोलिस करीत आहेत.

Post a Comment

Previous Post Next Post