प्रेस मीडिया लाईव्ह :
मुरलीधर कांबळे :
कोल्हापूर- उचगांव पैकी निगडेवाडी येथे डीसीबी बँकेचे एटीएम फोडून चोरी करण्याचा प्रयत्न करणाऱ्या गोंविदा राममिलन निसाद (वय 19.रा.राममिलन ग्राम बडगो,पोस्ट बौरब्यास ,उत्तरप्रदेश.सध्या रा.उचगांव पैकी निगडेवाडी) याला स्थानिक गुन्हे अन्वेषणच्या पथकाने 72 तासात अटक केली.
आरोपी निसाद याने बुधवार (दि.19 मार्च) रोजी मध्यरात्री अडीचच्या सुमारास निगडेवाडी येथे डीसीबी बँकेच्या बाहेरील बाजूस असलेले एटीएम मशीन तेथे असलेल्या सीसीटिव्हीवर अनोळखी व्यक्तीने स्प्रे मारुन एटीएम मशीनचा खालील बाजूस असलेला पत्रा उचकटून चोरी करण्याचा प्रयत्न केला होता.या गुन्हयांची नोंद गांधीनगर पोलिस ठाण्यात झाली होती.
सदरचा गुन्हयाचे गांभिर्य ओळखून वरिष्ठ पोलिस अधिकारी यांनी स्थानिक गुन्हे अन्वेषणचे पोलिस निरीक्षक रविंद्र कळमकर यांना सदरचा गुन्हा उघडकीस आणण्याच्या सूचना दिल्या होत्या.
वरिष्ठ अधिकारी यांनी दिलेल्या सुचने प्रमाणे स्थानिक गुन्हें शाखेतील तपास पथके तयार करून गुन्हा उघडकीस आणण्याचा प्रयत्न करत असताना पोलिस अंमलदार महेंद्र कोरवी यांना माहिती मिळाली की ,गांधीनगर पोलिस ठाण्यात दाखल असलेला गुन्हा हा उचगाव येथे रहात असलेला गोंविदा निसाद यांने केल्याची माहिती मिळाली.मिळालेल्या माहितीनुसार स्थानिक गुन्हे अन्वेषण पथकाने शुक्रवार (दि.21मार्च) रोजी नितीन दत्तात्रय निगडे यांच्या घरी भाड्याने रहात असलेली माहिती मिळाल्याने रहात असलेल्या घरातून निसाद याला ताब्यात घेऊन त्याच्याकडे चौकशी केली असता प्रथम त्याने उडवा उडवीची उत्तरे दिली.त्याच्याकडे अधिक चौकशी केली असता त्याने गुन्ह्याची कबुली दिली.त्याच्या कडुन गुन्हयांत वापरलेले ग्रायंडर मशीन,स्प्रे,गुन्हा करताना अंगावर असलेली कपडे,मोबाईल आणि इतर साहित्य असा एकूण 17 हजार 400/ रुपये किमंतीचा मुद्देमाल जप्त करून स्थानिक गुन्हे अन्वेषण पथकाने 72 तासात गंभीर स्वरूपाचा गुन्हा उघडकीस आणून त्याला पुढ़ील तपासासाठी गांधीनगर पोलिसांच्या ताब्यात देण्यात आले.
ही कारवाई मा.पोलिस अधीक्षक महेंद्र पंडीत,अप्पर पोलीस अधीक्षक मा.डॉ.धीरजकुमार बच्चू यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे अन्वेषणचे पोलिस निरीक्षक रविंद्र कळमकर, सहा.पोलिस निरीक्षक चेतन मसूटगे पोलिस महेद्र कोरवी,योगेश गोसावी ,वैभव पाटील,विशाल खराडे,शिवानंद मठपती यांच्यासह आदीने केली.