(कोल्हापूरचे नुतन अप्पर पोलिस अधीक्षक डॉ.धीरजकुमार बच्चू यांनी तत्कालीन अप्पर पोलिस अधीक्षक श्रीमती जयश्री देसाई यांच्या कडुन पदभार स्विकारला.या वेळी त्यांचे स्वागत करताना.)
प्रेस मीडिया लाईव्ह :
मुरलीधर कांबळे :
कोल्हापूर- कोल्हापुर पोलिस दलातील अप्पर पोलिस अधीक्षक श्रीमती जयश्री देसाई यांची बदली झाल्याने त्या जागी अमरावती ग्रामीणचे नुतन पोलिस अप्पर अधीक्षक डॉ.धीरजकुमार बच्चू यांची नियुक्ती झाली आहे.आज सकाळी कोल्हापुर येथे आल्या नंतर प्रथम आई अंबाबाई यांचे दर्शन घेऊन तत्कालीन पोलिस अप्पर पोलिस अधीक्षक श्रीमती जयश्री देसाई यांच्या कडुन पदभार स्वीकारला.
या वेळी पोलिस अधीक्षक मा.महेंद्र पंडीत व स्थानिक गुन्हे अन्वेषणचे पोलिस निरीक्षक रविंद्र कळमकर यांनी त्यांचे स्वागत केले.
कोल्हापूर येथे चांगले काम करण्याची भरपूर संधी आहे.आई अंबाबाईच्या आशिर्वादाने कोल्हापुरात काम करण्याची संधी मिळाली आहे.मी चांगले काम करणारयांच्या पाठीशी कायम पणे उभा राहिन.मात्र चुकीच्या कृत्यांना अजिबात थारा नाही.अशा सौम्य व कडक शब्दात नुतन पोलिस अप्पर अधीक्षक डॉ.बच्चू यांनी पदभार स्विकारताना सांगितले.अवैद्य व्यवसाय आणि अंमली पदार्थ तस्करांच्या टोळ्यांची असलेली दहशत मोडीत काढण्याचा निर्धार व्यक्त केला.बाल गुन्हेंगारी हा एक चिंतेचा विषय आहे.लहान गटातील तरुण मुले गंभीर गुन्हयांत पोलिस रेकॉर्डवर येत असून त्यांच्यात व्यसनाधीनता वाढ़त आहे.त्या मुळे आपण काय करतोय याचे भान त्या मुलांना रहात नाही.कोणत्याही किरकोळ कारणातुन घातक शस्त्राचा वापर बाल वयातच होत आहे.त्या मुळे बाल गुन्हेंगारी रोखण्यासाठी त्याचे प्रबोधन करण्यावर प्रथम प्राधान्य देणार असल्याचे या वेळी सांगितले.
महाराष्ट्र पोलिस दलातील 2019 च्या बँचचे पोलिस अधिकारी डॉ.धीरजकुमार बच्चू 2012 ला एमबीबीएस.झाले.त्यानंतर 1920 ते 1921 या कालावधीत प्रशिक्षणार्थी पोलिस अधिकारी म्हणून वडगांव पोलिस ठाण्यात त्यांची नेमणूक झाली.त्या वेळी कोल्हापूर जिल्ह्यातील सर्व पोलिस ठाण्यांना प्रत्यक्ष स्वतः भेट देऊन प्रशिक्षणार्थी म्हणून कामकाज आणि कायदा सुव्यवस्थाची माहिती घेतली.त्यानंतर त्यांची बिड जिल्हयातील माझलगांव येथे दोन वर्षे पोलिस उपअधिक्षक म्हणून कार्यरत होते.त्या नंतर त्यांची अमरावती (ग्रामीण) येथे पदोन्नती होऊन बदली झाली.मात्र तेथे हजर रुजू होण्याअगोदर कोल्हापुर येथे नियुक्ती झाली.