प्रेस मीडिया लाईव्ह :
मुरलीधर कांबळे :
कोल्हापूर- सीपीआर परिसरात थंड पदार्थाच्या काही हातगाड्या उभ्या असून काही हातगाडी चालक ताक तयार करून विक्री करतात.ते ताक थंड होण्यासाठी बर्फाचा वापर करतात.एका परप्रांतियाने बर्फाचा खर्च वाचविण्यासाठी सीपीआर रुग्णालयात मृतदेह बाहेरगावी घेऊन जाण्यासाठी वापरलेला बर्फाचा वापर ताक ,शीतपेय आणि पाणी थंड करण्यासाठी वापरल्याची घटना सीपीआर परिसरात उघडकीस आली.त्या विक्रेत्यावर काही कार्यकर्त्यानी पाळत ठेवून त्याला रंगेहात पकडल्याचा व्हिडीओ व्हायरल झाला आहे.
सीपीआर रुग्णालयात मयत झालेल्या मृतदेहाचे शवविच्छेदन करून सदरचा मृतदेह रुग्णवाहिकेतुन बाहेरगावी नेत असताना मृतदेह खराब होऊ नये म्हणून बर्फाचा वापर केला जातो.हा बर्फ रुग्णवाहिका परत आल्या नंतर जास्त बर्फ असेल तर तो बर्फ तेथील परिसरात टाकला जातो.बर्फ विकत घ्यायचा म्हटलं तर एका बर्फाची लादी कमीत कमी 100 रु.मिळते. त्यामुळे काही विक्रेते असा टाकून दिलेला बर्फ त्या परिसरात असलेल्या शीतपेये विक्री करणारे टाकलेला बर्फ गोळा करून शीतपेये थंड करण्यासाठी काहींना मिळाली होती.त्यांनी त्या विक्रेत्यावर पाळत ठेवून शनिवारी त्याला रंगेहात पकडून त्याचा व्हिडीओ करून तो समाज माध्यमावर व्हायरल करण्यात आला.
तो व्हिडीओ व्हायरल झाल्याने संबंधित विक्रेत्याला याचा जाब विचारला.
सदरची हातगाडी त्याच परिसरातील एकाची असून सापडलेली व्यक्ती परप्रांतिय असून ती गाडीवर कामावर असल्याची माहिती मिळाली.