"एएस"ट्रेडर्सच्या संचालकांसह एंजंटाची मालमत्ता जप्त करण्याच्या प्रक्रिया चालू , करवीर प्रांताधिकारी यांची नियुक्ती.


प्रेस मीडिया लाईव्ह :

मुरलीधर कांबळे :

कोल्हापूर - जादा परताव्याचे आमिष दाखवून गुंतवणूकदारांची फसवणूक केल्या प्रकरणी एएस ट्रेडर्सच्या संचालकांसह एजंटांची मालमत्ता जप्त करण्याचे आदेश राज्याच्या सचिवांनी दिले आहेत.हे सर्व अधिकार करवीर प्रांतिधिकारी यांची नियुक्ती करुन दिले आहेत.यामुळे एएसच्या संचालक आणि एंजट यांची मालमत्ता जप्त करून त्याचा लिलाव करण्याचा मार्ग सुकर झाला आहे.

या संदर्भात अधिक माहिती देताना तपास अधिकारी स्थानिक गुन्हे अन्वेषणचे पोलिस निरीक्षक रविंद्र कळमकर यांनी दिलेल्या माहितीनुसार एएस ट्रेडर्सच्या संचालक आणि एजंटांनी  गुंतवणूकदारांना जादा परताव्याचे आमिष दाखवून गुंतवणूकदारांची फसवणूक केल्या प्रकरणी आता पर्यत एएसच्या संचालक आणि एजंट अशा एकूण 17 जणांना अटक करण्यात आली आहे.पोलिसांनी यातील काहीच्या मालमत्ता संदर्भात माहिती मिळवून त्या मालमत्ता जप्त करून त्याचा लिलाव करण्यासाठी परवानगी मिळावी या साठी पोलिस अधीक्षकांनी प्रस्ताव तयार करून जिल्हाधिकारी आणि आर्थिक गुन्हें अन्वेषण विभागाकडे पाठविला होता.

या प्रस्तावाची पडताळणी करून राज्याच्या प्रधान सचिव यांच्याकडे सादर केला.त्यांनी मालमत्ता जप्तीच्या प्रस्तावाला मान्यता देत या कामी करवीर प्रांताधिरी यांची नियुक्ती केली.एएसच्या संचालक आणि एजंटांच्या मालमत्ता विकून आलेली रक्कम गुंतवणूकदारांला मिळणार आहे.

एएस कंपनीचा सुत्रधार लोहितसिंग (पलूस ),बाळासो धनगर (बहिरेवाडी),अमित शिंदे (कोल्हापुर) ,बाबासो धनगर (नेर्ली) ,दत्तात्रय तोडकर (कोडोली), दिपक मोहिते (आरे) राजेश पाडळकर (पाचगांव) साहेबराव शेळके व नामदेव पाटील (फुलेवाडी) ,महेश शेवाळे (पोर्ले / ठाणे)  ,आणि रोहित घेवडे यांच्या मालमत्ता जप्त करण्यात येणार असल्याचे पोलिसांनी माहिती दिली.

Post a Comment

Previous Post Next Post