प्रेस मीडिया लाईव्ह :
मुरलीधर कांबळे :
कोल्हापूर - करवीर तालुक्यातील कंळबा येथे गर्भलिंग प्रकरणातील गर्भलिंग निदान तपासणी करण्यासाठी सोनोग्राफी मशीन वापरणारा विजय कोळसकर (रा.मडीलगे ,ता.भुदरगड) याला करवीर पोलिसांनी अटक करून त्याला न्यायालयात हजर केले असता न्यायालयाने 6 मार्च पर्यत पोलिस कोठडी सुनावली आहे.
करवीर पोलिसांनी आणि जिल्हा परिषदांच्या आरोग्य विभागाने श्रध्दा हॉस्पिटलमध्ये 12 फ़ेब्रु.रोजी छापा टाकून कारवाई करुन गर्भलिंग तपासणी आणि गर्भपाताच्या गोळ्या विक्री प्रकरणी महिला डॉ.दिपाली ताईंगडे यांना या पूर्वीच अटक केली आहे.26 फ़ेब्रु.रोजी डॉ.ताईंगडे यांना गोळ्या पुरविणारा निकेश बोहरा ,सोनोग्राफी मशीनसह फरार झालेला सुयश हुक्केरी यांना या अगोदरच पोलिसांनी अटक केली आहे.पोलिसांनी सुयश हुक्केरी याच्याकडे केलेल्या चौकशीत एका संशयीताचे नाव उघड झाले होते.
पोलिसांनी नाव उघड झालेल्या संशयीताचा शोध घेऊन आज करवीर पोलिसांनी विजय कोळसकरला अटक केली.